Kolhapur Dog Attack : पाळीव कुत्र्याचा शाळकरी मुलावर हल्ला, हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी

बेल्जियम शेफर्ड जातीच्या कुत्र्याने एका लहान मुलावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केलं आहे. याप्रकरणी मुलांच्या घरचे आता पोलिसात गेले असून, सदर कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Kolhapur Dog Attack : पाळीव कुत्र्याचा शाळकरी मुलावर हल्ला, हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी
कोल्हापूरमध्ये पाळीव कुत्र्याचा शाळकरी मुलावर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 7:29 PM

कोल्हापूर : सध्या पाळीव प्राणी पाळण्याचं ट्रेंड खूप वाढत आहे. अनेक जण आपल्या घरात एखादा कुत्रा किंवा मांजर पाळत असतो. मात्र या पाळीव प्राण्यांना अनेक वेळा ट्रेनिंग दिली नसल्या कारणाने किंवा मोकळं सोडल्याने एखादी दुर्घटना घडते. अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे. बेल्जियम शेफर्ड जातीच्या कुत्र्याने एका लहान मुलावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केलं आहे. याप्रकरणी मुलांच्या घरचे आता पोलिसात गेले असून, सदर कुत्र्याच्या मालकाविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

क्लासला जात असताना कुत्र्याचा हल्ला

कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथे राहणाऱ्या रेखा हेमंत पाटील यांचा 13 वर्षाचा मुलगा सोहम हा क्लासला जात होता. यावेळी त्याच्यावर पाळीव कुत्र्याने हल्ला केला. तो सध्या गंभीर जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या श्वानाच्या मालकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. यापुढे अशा पद्धतीने कोणावरही असा प्रसंग येऊ नये आणि अशा पद्धतीचे श्वान आपल्याला नियंत्रित ठेवता येत नसतील तर सांभाळू नये, यासाठी आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचे मुलाच्या बहिणीने सांगितले.

हे सुद्धा वाचा

पोलिसांचे प्राणी प्रेमींना आवाहन

पाळीव प्राणी पाळताना प्राण्यांच्या मालकांनी योग्य ती काळजी घ्यावी अन्यथा त्यांच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हाही दाखल होऊन सहा महिन्यापर्यंतचे शिक्षा होऊ शकते, असे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.

आज सोहमसोबत घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर श्वानप्रेमींनी ही श्वान पाळण्यासाठी असणारे नियमही माहित करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा अशी घटना घडल्यास श्वान प्रेमींना जेलवारी करायची वेळ येऊ शकते.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.