घराबाहेर खेळत होती चिमुरडी, माथेफिरुने केले असे काही; वाचा काळजाचा थरकाप उडवणारी घटना

इंदूरच्या गणेश चौक परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. यावेळी तिची आजीही तिच्या सोबत होती.

घराबाहेर खेळत होती चिमुरडी, माथेफिरुने केले असे काही; वाचा काळजाचा थरकाप उडवणारी घटना
झारखंडमध्ये कॉपी केल्याच्या संशयातून मुलीसोबत भयंकर कृत्य
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 11:36 PM

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. घराबाहेर खेळत असलेल्या 7 वर्षाच्या चिमुरडीची एका माथेफिरुने निर्घृण हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपी (Accuse) आणि पीडित मुलगी शेजारी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे. सद्दाम असे सदर माथेफिरु आरोपीचे नाव आहे.

आरोपीने जबरदस्तीने पळवून नेले

इंदूरच्या गणेश चौक परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. यावेळी तिची आजीही तिच्या सोबत होती. यावेळी आरोपी अचानक तेथे आला आणि त्याने मुलीला बळजबरीने खेचून नेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मुलीच्या आजीने धावत येऊन त्याला विरोध केला. मात्र आरोपीने आजीला मारहाण केली. यानंतर आरोपी मुलीला आपल्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

आरोपी मानसिक रुग्ण असल्याची माहिती

सद्दाम हा मानसिक रुग्ण असल्याचे बोलले जात आहे. मात्र पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिला नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. आरोपीने कोणत्या कारणातून हे कृत्य केले याबाबत पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होईल.

मुलीच्या आईचे दहा वर्षांपूर्वी झाले निधन

पीडित मुलीच्या आईचे दहा महिन्यांपूर्वी निधन झाले होते. यानंतर मुलगी आपल्या आजी आजोबांकडे राहत होती. नेहमीप्रमाणे दुपारी 12 च्या सुमारास ती घराबाहेर खेळत होती.

आरोपीने मुलीला पळवून नेले. त्यानंतर काही वेळाने तो बाहेर आला तेव्हा त्याच्या अंगावर रक्त दिसले. आजीसह शेजाऱ्यांनी धावत जाऊन पाहिले असता मुलगी जखमी अवस्थेत आढळली. लोकांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.