
हरियाणातील पानीपत जिल्ह्यातून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. सुंदर चेहऱ्याची मुले-मुली पाहिली की ती स्त्री त्यांना पाण्यात बुडवून मारून टाकायची. कारण फक्त एवढंच की कोणीही तिच्यापेक्षा जास्त सुंदर दिसू नये. इतकंच नव्हे तर आपल्या शंकेपोटी तिने स्वतःच्याच मुलालाही ठार मारलं. आतापर्यंत तिने एकूण चार लहान मुलांचे बळी घेतले आहेत, यात तिचा स्वतःचा मुलगाही आहे.
नेमकं काय घडलं?
१ डिसेंबर रोजी पानीपतजवळील नौल्था गावात लग्नसमारंभासाठी आलेल्या कुटुंबाच्या घरी स्टोअर रूममधील पाण्याच्या टबमध्ये ६ वर्षीय विधी नावाच्या मुलीचा मृतदेह आढळला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना ही भयानक हत्या करणारी स्त्री सापडली. पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिलेने कबुली दिली की, “जेव्हा-जेव्हा मला माझ्यापेक्षा जास्त सुंदर मूल-मुलगी दिसायची, तेव्हा मी तिला/त्याला पाण्यात बुडवून मारून टाकायचे. यात माझ्या स्वतःच्या मुलालाही मी ठार मारलं, जेणेकरून कोणाला शंका येऊ नये.”
वाचा: स्मृती मानधनाच्या लग्नाबाबत मोठी अपडेट! नवी तारीखच समोर, कुणासोबत होणार विवाह?
आतापर्यंत या महिलेने चार मुलांची हत्या केली आहे. यात तिचा स्वतःचा मुलगा आणि विधीचा समावेश आहे. उरलेल्या दोन मुलांच्या मृत्यूला कुटुंबीयांनी अपघाती मृ्त्यू समजले होते. पण आता सत्य उघड झाले आहे. त्यांनी या महिलेला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या महिलेला अटक तर केली आहे. आता तिला कोणती शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोण आहे ही महिला?
ही महिला मूळची पानीपतजवळील सिवाह गावातील आहे आणि सोनीपत जिल्ह्यातील बोहड गावात तिचा विवाह झाला होता. तिला पोलिसांच्या सीआयए-वन टीमने 36 तासांच्या आत अटक केली आहे. पोलीस अधीक्षक भूपेंद्र सिंह (आयपीएस) यांच्या नेतृत्वात ही मोठी कामगिरी झाली आहे. आज तिला न्यायालयात हजर केलं जाईल आणि पुढील चौकशीसाठी रिमांडवर घेतलं जाईल. ही घटना ऐकून मन सुन्न होतं. एका आईनेच लहान बाळांना फुलासारखं जपण्याऐवजी एवढ्या क्रूरपणे संपवले.