स्मृती मानधनाच्या लग्नाबाबत मोठी अपडेट! नवी तारीखच समोर, कुणासोबत होणार विवाह?
स्मृती मानधना सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्याविषी सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. आता स्मृतीच्या लग्नाची नवी तारीख समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना ही चांगलीच चर्चेत आहे. स्मृती 23 नोव्हेंबर रोजी संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबत लग्न करणार होती. पण काही कारणास्तव त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. आता त्यांच्या लग्नाची नवी तारीख सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, या तारखेविषयी स्मृती किंवा पलाश यांच्याकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
नवी तारीख काय?
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न 23 नोव्हेंबरला होणार होतं, पण ते पुढे ढकललं गेलं. आता सोशल मीडियावर दावा केला जातोय की दोघांचं लग्न 7 डिसेंबरला होणार आहे. रविवारी पलाश लग्न पुढे ढकलल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला, तो एअरपोर्टवर स्पॉट झाला होता. आता लग्नाच्या या बातम्यांवर खुद्द स्मृतीच्या भावाच्या भावाने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
Happy for both the couple that they are going to be married 😊😊 And people from social media including celebrities, so called journalists who criticised the Palash Muchhal without knowing the truth will be shamed …. #marriage #cricket #song pic.twitter.com/Jh21Bh8LHC
— Anupam Vijeta (@anupam_vijeta) December 2, 2025
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न 7 डिसेंबरला होणार, ही बातमी व्हायरल होताच चाहत्यांनी सोशल मीडियावर दोघांना शुभेच्छांचा वर्षाव केला. एका युजरने लिहिलं, “पलाश आणि स्मृतीचं लग्न 7 डिसेंबरला होतंय, फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक हजर राहणार.” दुसऱ्या युजरने अभिनंदन करत लिहिलं, “दोघांचं लग्न होतंय म्हणून मला खूप आनंद झाला.”
स्मृती माधनाच्या भावाने काय सांगितलं?
7 डिसेंबरला लग्न होणार या बातमीवर स्मृतीचा भाऊ श्रवण मानधना यांनी प्रतिक्रिया दिली. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना तो म्हणाला, “मला या अफवांबद्दल काही माहिती नाही. मला फक्त इतकंच माहिती आहे की लग्न आतापर्यंत पुढे ढकललंच आहे (पोस्टपोनच आहे).”
स्मृती मानधनाचं लग्न का पुढे ढकललं गेलं?
स्मृती आणि पलाश यांचं लग्न 23 नोव्हेंबरला होणार होतं, दोघे खूप खुश होते. लग्नापूर्वी हळदीपासून संगीतपर्यंत सर्व सोहळ्यात कुटुंबीय आणि मित्रांनी धमाल उडवली होती. पण लग्नाच्या दिवशी अचानक बातमी आली की स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अतिशय गंभीर झाली आहे, त्यामुळे लग्न पुढे ढकलावं लागलं. त्यानंतर कळलं की पलाशलाही रुग्णालयात दाखल करावं लागलं. दोन्ही कुटुंबांनी आरोग्याला प्राधान्य देत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र सोशल मीडियावर पलाशचे काही मेसेजचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले, ज्यात दावा करण्यात आला की पलाश स्मृतीला फसवत होता आणि याच कारणामुळे लग्न थांबवलं गेलं. पण या बातम्यांना अधिकृतरीत्या कुठेच दुजोरा मिळालेला नाही.
