AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसुत्र हिसकावले, डिलिव्हरी बॉयच्या वेषात चेन स्नॅचिंगचा प्रकार

आरोपीकडून ९० हजार रूपये किंमतीचे २ तोळे सोने आणि गुन्ह्यातील एक दुचाकी गाडी तसेच सोने गहाण ठेवून मिळालेली १ लाख रुपये रक्कम असा एकुण २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा माल जप्त केला

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसुत्र हिसकावले, डिलिव्हरी बॉयच्या वेषात चेन स्नॅचिंगचा प्रकार
| Updated on: May 19, 2025 | 8:39 PM
Share

पुणे येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसुत्र एका स्विगी डिलीवरी बॉयच्या वेशात मोटारसायकलवरुन आलेल्या तरुणाने हिसावल्याची खळबळजनक घटना १६ मे रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणात संशय येऊ नये म्हणून या तरुणाने स्विगी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयचा पेहराव घातला होता.या तरुणाला अखेर सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांना दुपारी शोधून काढत त्यास अटक केली आहे.

पुण्यातील सहकार नगरात राहणाऱ्या एक महिला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंगवॉकला जात होत्या. त्यावेळी हिलटॉप सोसायटी, सिध्दीविनायक मंदिरा जवळ धनकवडी येथे दुचाकीवरील तरुणाने त्याच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पलायन केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी सकाळी ६ वाजता फिर्यादी हिलटॉप सोसायटी,सिध्दीविनायक मंदिराजवळ धनकवडी येथे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या.यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी तरुणाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून नेले.

पुणे सहकारनगर पोलीसांची कारवाई

ज्येष्ठ महिलेने या संदर्भात सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. अमोल किसन नाकते ( वय २७) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेचा तपास करीत असताना पोलिसांनी परिसरातील १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून गुन्हा केलेला आरोपी हा स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून फिरत असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीचा शोध घेत असताना हा तरुण आंबेगाव पठार येथे कोणाची तरी वाट पाहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी साध्या वेषातील पोलीस पाठवून कारवाई केली. पोलिस येताच त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी त्याच्या मागे जात त्याला ताब्यात घेतले.

मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.