दुकान शटर तोडून बुरखाधारी चोरट्याकडून लाखोंची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत मस्कासाथ परिसरात मामा अगरबत्ती शॉप नावाचे होलसेलचे दुकान आहे. या दुकानात काल रात्री चोरट्याने शटर तोडून प्रवेश केला.

दुकान शटर तोडून बुरखाधारी चोरट्याकडून लाखोंची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद
अगरबत्तीच्या दुकानातील सात लाख लंपास
Image Credit source: TV9
| Updated on: Feb 22, 2023 | 4:51 PM

नागपूर / सुनील ढगे (प्रतिनिधी) : दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करुन बुरखाधारी चोरट्याने गल्ल्यातील सात लाख रुपयांची रोकड चोरल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मस्कासाथ परिसरातील मामा अगरबत्ती शॉपमध्ये ही चोरीची घटना घडली. याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. मालक सकाळी दुकान उघडायला आल्यानंतर चोरीची घटना उघड झाली.

अगरबत्ती शॉपचे शटर तोडून चोरी

नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत मस्कासाथ परिसरात मामा अगरबत्ती शॉप नावाचे होलसेलचे दुकान आहे. या दुकानात काल रात्री चोरट्याने शटर तोडून प्रवेश केला. यानंतर दुकानातील गल्ल्यातील सात लाख रुपये कॅशसह काही साहित्य घेऊन चोरटा फरार झाला. मात्र संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मालक दुकान उघडण्यास आला असता घटना उघड

सकाळी दुकान मालक नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यास आले असता सदर घटना उघडकीस आली. यानंतर मालकाने तात्काळ पाचपावली पोलीस ठाण्यात चोरीची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करत अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला. पाचपावली पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे संपूर्ण घटनेचा तपास करत असून, आरोपीचा शोध घेत आहेत.

व्यसन करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना बेड्या

व्यसन पूर्ण करण्यासाठी पैशाची चणचण भासत असल्याने दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना नागपुरच्या मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. दुचाकी चोरी करुन मग त्यांची विक्री करत पैसे मिळवायचे आणि आपले व्यसन पूर्ण करायचे. राहुल डोईजड आणि साहिल मोर्य अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींवर गुन्हा दखल केला असून, मानकापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.