AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता काय म्हणायचं या रिक्षावाल्याला? थेट कुर्ला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच रिक्षा आणली आणि मग…

. या रिक्षावाल्याने थेट कुर्ला रेल्वे स्टेशनच्या(Kurla railway station) प्लॅटफॉर्मवरच रिक्षा आणली.

आता काय म्हणायचं या रिक्षावाल्याला? थेट कुर्ला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच रिक्षा आणली आणि मग...
| Updated on: Oct 16, 2022 | 4:48 PM
Share

मुंबई : रिक्षा चालकांची अरेरावी आणि दादागीराचा त्रास प्रवाशांना नेहमीच होत असतो. प्रवाशी याबाबत वारंवार तक्रारी देखील करत असतात. अशाच एका बेजबाबदार आणि अतिउत्साही रिक्षावाल्याल्यावर थेट रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे. या रिक्षावाल्याने थेट कुर्ला रेल्वे स्टेशनच्या(Kurla railway station) प्लॅटफॉर्मवरच रिक्षा आणली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या रिक्षावाल्यावर कारवाई करत त्याला कोर्टात नेले.

कुर्ला रेल्वे स्थानक हे मुंबईतील एक गजबजलेले रेल्वे स्थानक आहे. येथे प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी आणि वदर्ळ असते. अशातच एका रिक्षाचलाकाने प्रवाशांची घाबरगुंडी उडवणारे कृत्य केले आहे.

एका रेल्वे प्रवाशाने या रिक्षा चालकाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कुर्ला स्थानकातील एक नंबर प्लॅटफॉर्मवर एक रिक्षा आल्याचे दिसत आहे. रिक्षाला पाहून स्टेशनवर उभे असलेले प्रवाशी रिक्षाजवळ जातात.

यानंतर हा रिक्षा चालक रिक्षा वळवतो आणि तो स्टेशनच्या बाहेर पडत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. रिक्षा वळवण्यासाठीच रिक्षा प्लॅटफॉर्मवर आणल्याचे या रिक्षाचालकाचे म्हणणे होते.

ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला त्याने  रेल्वे प्रशासनालाही टॅग केले होते. व्हिडिओ पाहिल्यानंतर तात्काळ या रिक्षा चालकावर कारवाई करण्यात आली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला कुर्ला येथील आरपीएफ चौकीत आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याची रिक्षा देखील जप्त करण्यात आली.

रिक्षा चालकाला सीएसएमटी येथील रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दंडासह शिक्षा देखील करण्यात आल्याचे समजते.

लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.