मृत समजून भावांनी बहिणीचे अंत्यसंस्कार केले, मात्र तरुणीचा बनाव अखेर उजेडात आलाच; वाचा नेमके काय घडले?

घरचे लोक आपल्या लग्नाला विरोध करतील अशी भिती पायलला होती. या भितीतून तिने प्रियकराच्या मदतीने हा कट रचला आणि अंमलात देखील आणला.

मृत समजून भावांनी बहिणीचे अंत्यसंस्कार केले, मात्र तरुणीचा बनाव अखेर उजेडात आलाच; वाचा नेमके काय घडले?
प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरुणीने केला मृत्यूचा बनावImage Credit source: social
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 7:01 PM

नोएडा : प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरुणीने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक घटना नोएडात उघडकीस आली आहे. तरुणीचा मृत्यू झाला समजून तिच्या भावांनी तिचे अंत्यसंस्कार केले. मात्र एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना तरुणीचा हा बनाव उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी तरुणी आणि तिच्या प्रियकरासह चार लोकांना अटक केली आहे. पायल असे तरुणाचे आणि अजय असे तिच्या प्रियकराचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

अजय आणि पायलचे प्रेमसंबंध होते. दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते. पायलचे बीएपर्यंत शिक्षण झाले आहे. घरचे तिच्या लग्नाची तयारी करत होते. यासाठी ते पायलसाठी स्थळंही पाहत होते.

यामुळे घरचे लोक आपल्या लग्नाला विरोध करतील अशी भिती पायलला होती. या भितीतून तिने प्रियकराच्या मदतीने हा कट रचला आणि अंमलात देखील आणला.

हे सुद्धा वाचा

यासाठी पायल आणि अजयने पायलसारख्या दिसणाऱ्या मुलीचा शोध घेतला. त्यानंतर त्या तरुणीची हत्या केली. चेहरा ओळखता येऊ नये म्हणून चेहऱ्यावर अॅसिड टाकले. त्यानंतर मृतदेहाला पायलचे कपडे घातले.

हत्येनंतर मृतदेहाजवळ सुसाईड नोट ठेवली. या नोटमध्ये आपला खराब झाल्याने आपल्याला जगण्याची इच्छा नाही, त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले.

दादरी पोलिसांना 12 नोव्हेंबर रोजी 21 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सुसाईड नोटवरुन मृतदेह पायलचा असल्याचे उघड झाले. यानंतर पायलच्या भावांनी तिचे अंत्यसंस्कारही केले.

अशी उघडकीस आली घटना?

या दरम्यान, हेमलता नामक तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या भावाने पोलिसात केली. पोलिसांनी तरुणीचा शोध सुरु केला. यासाठी पोलिसांनी तरुणीचे मोबाईल लोकेशन काढले. मोबाईल लोकेशन ट्रेस करताना पोलिसांना अजयचा नंबर मिळाला.

पोलिसांनी अजयला ताब्यात चौकशी केली असता सर्व बिंग फुटले. अजयमार्फत पोलीस पायलपर्यंत पोहचले. पायलची चौकशी केली असता तिने सर्व हकीकत सांगितली. यानंतर पोलिसांनी पायल आणि अजयसह चौघांना अटक केली आहे.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.