Thane Murder : पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयातून तरुणाची पतीकडून हत्या, ठाण्यातील खळबळ घटना

तरुणाचा शोध सुरु असतानाच पोलिसांना एक अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता तो जयेशचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.

Thane Murder : पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयातून तरुणाची पतीकडून हत्या, ठाण्यातील खळबळ घटना
लातूरमध्ये सासूची हत्या करुन जावयाची आत्महत्या
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 01, 2022 | 2:48 AM

ठाणे : पत्नीशी अनैतिक संबंध (Immoral Relations) ठेवल्याच्या संशयातून पतीने संबंधित तरुणाची हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना रविवारी ठाण्यात उघडकीस आली आहे. जयेश वळिंबे (26) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुण 22 जुलैपासून बेपत्ता होता. तरुणाचा शोध घेत असताना तपासादरम्यान तरुणाची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी पतीला अटक (Arrest) केले आहे. पुंडलिक वाळिंबे असे आरोपीचे नाव आहे. कोणताही पुरावा मिळू नये यासाठी आरोपीने तरुणाला वीजेचा शॉक देऊन त्याची हत्या केली. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण ?

मयत तरुण जयेश वाळिंबे हा 22 जुलैपासून अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मित्रांकडे चौकशी केली. मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर कुटुंबीयांना खिनवली पोलीस ठाण्यात जयेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी तरुणाचा शोध सुरु केला. तरुणाचा शोध सुरु असतानाच पोलिसांना एक अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता तो जयेशचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. जयेशची हत्या झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्यानुसार तपास सुरु केला. चौकशीदरम्यान कुटुंबीयांनी पुंडलिक वाळिंबेवर जयेशचा हत्येचा आरोप केला. त्यानुसार पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्या आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (A young man was killed by husband on suspicion of having an immoral relationship with his wife in Thane)