AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरधाव डंपरची दुचाकीला धडक, डोक्यावरुन चाक गेल्याने तरुणी जागीच ठार

जळगावकडून धुळ्याकडे जात असताना महामार्गावरील शिवकॉलनी परिसरातील रेल्वे उड्डाणपूलावर या डंपरने मोपेड दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

भरधाव डंपरची दुचाकीला धडक, डोक्यावरुन चाक गेल्याने तरुणी जागीच ठार
जळगावात भरधाव डंपरची दुचाकीला धडकImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Nov 15, 2022 | 7:48 PM
Share

जळगाव : भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील बहिण भावापैकी बहिणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळागावात घडली आहे. मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे असे मयत 20 वर्षीय तरुणीचे नाव आहे. या दुर्देवी अपघातात तरुणीचा भाऊ सुदैवाने बचावला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला आहे.

रेल्वे उड्डाणपुलावर घडला अपघात

जळगाव शहरातील शिवकॉलनी रेल्वे उड्डाणपुलावर हा आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जळगावकडून धुळ्याकडे जात असताना महामार्गावरील शिवकॉलनी परिसरातील रेल्वे उड्डाणपूलावर एमएच 19 सीवाय 3311 या क्रमाकांच्या डंपरने मोपेड दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

डोक्यावरुन डंपरचे चाक गेल्याने जागीच मृत्यू

डंपरची धडक बसताच दुचाकीवरील तरुणी रस्त्यावर पडली. यावेळी तिच्या डोक्यावरुन डंपरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे हा थोडक्यात बचावला आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला

घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला

पोलिसांनी तरुणीचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी सदर डंपर ताब्यात घेतला असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट