पोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलीस उपनिरीक्षकावर अत्याचार, महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

आरोपी अनिकेत शिंदेने 2019 ते 2022 दरम्यान अनेकदा बलात्कार केले असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. अनिकेत शिंदे आणि पीडित महिलेची नाशिक येथे पोलीस प्रशिक्षणा दरम्यान ओळख झाली आणि प्रेमसंबंध जुळले.

पोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलीस उपनिरीक्षकावर अत्याचार, महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पोलीस उपनिरीक्षकाचा महिला पोलीस उपनिरीक्षकावर अत्याचारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 6:04 PM

नवी मुंबई : प्रेमाचे नाटक करुन लग्नाचे आमिष दाखवत पोलीस उपनिरीक्षकाने महिला उपनिरीक्षकावर बलात्कार केल्याची घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत गुलाबराव शिंदे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 29 वर्षीय आरोपी पोलिसाचे नाव आहे.

तीन वर्षात अनेकदा बलात्कार केल्याचा पीडितेचा आरोप

आरोपी अनिकेत शिंदेने 2019 ते 2022 दरम्यान अनेकदा बलात्कार केले असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. अनिकेत शिंदे आणि पीडित महिलेची नाशिक येथे पोलीस प्रशिक्षणा दरम्यान ओळख झाली आणि प्रेमसंबंध जुळले.

लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेत अत्याचार

पीडितेबरोबर प्रेमसंबंध प्रस्थापित करून आरोपीने तिला बदनाम करण्याची धमकी दिली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून नाशिक शहरातील वेगवेगळ्या लॉजमध्ये, तसेच मुंबई, नागपूर आणि घणसोली येथील पीडितेच्या राहत्या घरी तिच्यासोबत लगट करून जबरदस्तीने शारिरीक तसेच अनैसर्गिक संबंध ठेवले.

हे सुद्धा वाचा

आरोपी समतानगर पोलीस ठाण्यात कार्यरत

आरोपी अनिकेत शिंदे हा मुंबई कालिना परिसरातील समतानगर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. त्याच्या विरोधात भादंवि कलम 376, 376 (2)(n), 377, 354(अ), 354(ड) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपीला अद्याप अटक नाही

दरम्यान, आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे पोलीस दलातील महिला कर्मचारी किती सुरक्षित आहेत? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.