AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन रमीचा नाद कॅब चालकाला महागात पडला, जंगली रमीमध्ये 20 हजार रुपये हरला मग थेट…

ऑनलाईन गेमच्या नादापायी गुन्हेगारी घटना वाढत आहेत. अनेकांना या ऑनलाईन गेमने वेड लावले आहे. या वेडापायी तरुणाई टोकाचे पाऊलही उचलत आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे.

ऑनलाईन रमीचा नाद कॅब चालकाला महागात पडला, जंगली रमीमध्ये 20 हजार रुपये हरला मग थेट...
जंगली रमीमध्ये पैसे हरल्याने कॅब चालकाने जीवन संपवलेImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 10, 2023 | 1:39 PM
Share

पुणे : ऑनलाईन गेम खेळणे एका कॅब चालकाच्या जीवावर बेतला आहे. ऑनलाईन जंगली रमीमध्ये 20 हजार रुपये हरल्याने नैराश्येतून तरुणाने जीवन संपवल्याची घटना मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेमध्ये घडली आहे. गणेश काळदंते असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. गणेश हा कॅब चालक होता. तसेच त्याला मद्यपान आणि ऑनलाईन जंगली रमी खेळण्याचं व्यसन होतं, अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली. याच व्यसनातून त्याने टोकाचे पाऊल उचलले. ऑनलाईन मोबाईल गेममुळे अनेक जण आपले बँक खाते रिकामे करत आहेत. तसेच ऑनलाईन गेमच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटनाही वारंवार घडत आहेत.

घरी सर्वजण असताना गणेशने बेडरुमध्ये जीवन संपवले

गणेश काळदंते हा तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहे. तो चालक असून स्वतःची गाडी आहे. परंतु गणेशला मद्यपान आणि ऑनलाईन गेम जंगली रमीचं व्यसन जडलं. तो मोबाईलवर जंगली रमी खेळायचा. रविवारी गणेश घरात सर्व कुटुंबीय बसलेल्या असताना त्याच्या बेडरूममध्ये गेला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीच त्याचे जंगली रमीमध्ये वीस हजार रुपये गेल्याचं पोलिसांनी सांगितलं. यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलीस व्यक्त करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.