AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दरमहिना लाखाचा हप्ता, उस्मानाबादेत महसूल विभागाची वरिष्ठ महिला अधिकारी रंगेहाथ अटक

उस्मानाबाद लाचलुचपत विभागाच्या या कारवाईत महसूल विभागाचा एक वरिष्ठ दर्जाचा एक मोठा अधिकारी जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.

दरमहिना लाखाचा हप्ता, उस्मानाबादेत महसूल विभागाची वरिष्ठ महिला अधिकारी रंगेहाथ अटक
लाच घेताना वरिष्ठ अधिकारी जाळ्यात
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 28, 2021 | 7:46 AM
Share

उस्मानाबाद : भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर यांच्यासह एका जणाला उस्मानाबाद येथील लाचलुचपत विभागाने मंगळवारी अटक केली. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्याकडे वाळूचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती. एक लाख 10 हजार रुपयांची दरमहा हप्तारुपी लाच घेताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद लाचलुचपत विभागाच्या या कारवाईत महसूल विभागाचा एक वरिष्ठ दर्जाचा एक मोठा अधिकारी जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय तेजीत सुरू असून अधिकारी यांना दरमहा लाखो रुपयांची लाच द्यावी लागते हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर यांच्यासह एका कोतवालास 1 लाख 10 हजाराच्या लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा लाच मागितल्याचा आरोप आहे. मनिषा अरुण राशिनकर आणि कोतवाल विलास नरसिंग जानकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 1 लाख 10 हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 90 हजार आणि 20 हजार आरोपी जानकरने स्वीकारले.

भुम येथे गुन्हा दाखल

तक्रारदार यांचा एक टीप्पर आणि त्यांच्या पाहुण्यांचा जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी लाच घेतली असून पोलीस ठाणे भुम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रभर चालू होती. सापळा अधिकारी प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद यांनी डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद ब्रम्हदेव गावडे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. या पथकात पोलिस निरीक्षक गौरिशंकर पाबळे, अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके यांचा समावेश होता

संबंधित बातम्या : 

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील कर्ज प्रकरण, तीन तत्कालीन अधिकाऱ्यांना अटक

अंबरनाथमध्ये रेशनिंग विभागाचे दोन क्लार्क एसीबीच्या जाळ्यात, दीड हजारांची लाच घेताना रंगेहाथ

(ACB arrested Osmanabad Bhum Senior Lady Officer in Revenue Department red handed while receiving bribe)

Follow Us
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?