Palghar Crime | कोरोना झाल्याने रुग्णालयात उपचार, पोलिसांचा पहारा भेदून पालघरमधील आरोपी फरार, पळ कसा काढला ?

कोरोनाची लागण झाल्यामुळे या आरोपीवर पालघरच्या (Palghar) करोना (Corona) उपचार केंद्रात उपचार सुरु होते. मात्र रुग्णालयातून पहाटे आरोपीने पळ काढला. विशेष म्हणजे तीन पोलिसांच्या निगराणी खाली असताना आरोपीने पळ काढल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.

Palghar Crime | कोरोना झाल्याने रुग्णालयात उपचार, पोलिसांचा पहारा भेदून पालघरमधील आरोपी फरार, पळ कसा काढला ?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 1:30 PM

मोहम्मद हुसेन, टीव्ही 9 मराठी, पालघर : गोमांस तस्कर प्रकरणात अटक असलेल्या आरोपीने पोलीस (Police) सरंक्षण असताना पळ काढला आहे. त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर या आरोपीचा पोलिसांकडे ताबा होता. कोरोनाची लागण झाल्यामुळे या आरोपीवर पालघरच्या (Palghar) करोना (Corona) उपचार केंद्रात उपचार सुरु होते. मात्र रुग्णालयातून पहाटे आरोपीने पळ काढला. विशेष म्हणजे तीन पोलिसांच्या निगराणी खाली असताना आरोपीने पळ काढल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. तसे पोलिसांचा पहारा असतानाही आरोपीने पळ नेमका कसा काढला ? असे विचारले जात आहे.

तीन पोलींचा पहारा, तरीही आरोपी फरार 

मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी मनोर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोमांस तस्करी प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलं होतं. मात्र अटक केलेल्या तीन आरोपींपैकी एक आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार झाला आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याला केळवे पोलिसांच्या देण्यात आले होत. पोलिसांच्या ताब्यात असताना या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. या आरोपीवर पालघरच्या कोविड उपचार केंद्रामध्ये उपचार सुरू होते. याचदरम्यान या आरोपीने पहाटे पळ काढला. रात्री तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा यांचा कडक पहारा असतानाही त्याने पळ काढला. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

दोन महिन्यांपासून फरार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचं दोन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलं होतं. याच परिसरातील सराईत गुन्हेगार संतोष बाबू अण्णा उर्फ अंडापाव यानं या मुलीचं अपहरण केलं होतं. यानंतर पोलीस अंडापाव याचा आणि अपहृत मुलीचा शोध घेत होते. मात्र अंडापाव यानं आपला फोन बंद करून ठेवला असल्यानं पोलिसांना त्याचा माग काढता येत नव्हता. पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारे अंडापावचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र तब्बल दोन महिन्यांनी या आरोपीने एक चूक केली. त्याच्या याच चुकीचा फायदा उचलत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

इतर बातम्या :

Virat Kohli Test Captaincy : Shocked!! विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन…

Pune Crime | पुण्यात बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून टिक्का भाजण्याच्या सळईने मारहाण

Nagpur Crime | सासूसोबत झाला वाद, मुलाला विष पाजून स्वतःही घेतले; दीड वर्षीय बाळाचा मृत्यू..