Nagpur Crime | सासूसोबत झाला वाद, मुलाला विष पाजून स्वतःही घेतले; दीड वर्षीय बाळाचा मृत्यू..

Nagpur Crime | सासूसोबत झाला वाद, मुलाला विष पाजून स्वतःही घेतले; दीड वर्षीय बाळाचा मृत्यू..
रामटेक पोलीस ठाणे

रामटेक तालुक्यातील ही घटना मन हेलावून टाकणारी आले. सासुसोबत वाद झाला म्हणून सुनेने आत्महत्येचा प्रयत्न केला. दीड वर्षाच्या चिमुकल्यालाही विष दिले. यात मुलाचा मृत्यू झाला असून ती रुग्णालयात उपचार घेत आहे.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 16, 2022 | 12:17 PM

नागपूर : घरोघरी वाद हा होतच असतो. पण, या वादात कोणाचा बळी जाईल काही सांगता येत नाही. रामटेक (Ramtek) तालुक्यात सासू-सुनेचा वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, सुनेला जीवन नकोसे वाटायला लागले. तिने स्वतः विष प्राशन केले. तिच्यापोटी दीड वर्षांचे बाळ होते. मी मेल्यानंतर मुलाचे काय होईल, अशी भीती तिच्या मनात होती. त्यामुळं तिनं मुलालाही विष (Poison) दिले. यात मुलाचा मृत्यू झाला. पण, वेळेवर उपचार मिळाल्यानं संबंधित महिला बचावली. पोलिसांनी विष पाजून मारल्याप्रकरणी तसेच स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केलाय.

चिमुकल्याचा मृत्यू, महिलेवर उपचार सुरू

रामटेक तालुक्यात बनपुरी नावाचं गाव आहे. या गावात प्रणाली (वय 22) रामकृष्ण धावडे या महिलेची तिच्या सासूशी भांडण झाले. त्यानंतर घरचे लोकं शेतावर कामासाठी गेले. प्रणालीने पोटच्या पोराला विष पाजले. त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. यात चिमुकल्या वेदांतचा मृत्यू झाला. प्रणालीला शेजाऱ्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तात्काळ उपचार मिळाल्याने प्रणालीचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. रामटेक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महिलेविरोधात दाखल झाला गुन्हा

प्रणालीची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सासूसोबत झालेल्या भांडणाचा राग काढण्यासाठी स्वतःचा दीड वर्षीय चिमुकल्याला विष पाजणाऱ्या प्रणाली विरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या शिवाय स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्यासंदर्भातील गुन्हा दाखल केला असल्याची माहिती रामटेकचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी दिली आहे.

माजी आमदार सेवक वाघाये यांची घरवापसी; नाना पटोलेंशी आता तरी जुळवून घेणार काय?

Nagpur Medical | मेडिकलमध्ये ऑक्सिजनला लागली होती गळती; मोठी दुर्घटना कशी टळली?

NMC election | नागपुरात भाजपाचा मायक्रो प्लानिंगवर भर; शिवसैनिक म्हणतात, निवडणुकीसाठी पुढाकार कोण घेणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें