AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःला मूल होत नसल्याने चिमुकल्याचे अपहरण, पोलिसांनी 48 तासात मुलाला शोधून काढले !

बाळूमामा मंदिरात आईसोबत दर्शनासाठी आलेल्या सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना कोल्हापुरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुलाची सुटका करत आरोपी जोडप्याला अटक केली आहे.

स्वतःला मूल होत नसल्याने चिमुकल्याचे अपहरण, पोलिसांनी 48 तासात मुलाला शोधून काढले !
अपहरण झालेल्या सहा वर्षाच्या मुलाची सुटकाImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 07, 2023 | 2:37 PM
Share

कोल्हापूर / भूषण पाटील : स्वतःला मूल नसल्याने चिमुकल्याचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला 48 तासांच्या आत पोलिसांनी अटक केली आहे. बाळूमामा येथून अपहरण केलेल्या मुलाला कोल्हापूर पोलिसांनी 48 तासांत शोधून काढले. बालकाला पळवून नेणाऱ्या जोडप्याला काल रात्री अटक करण्यात आली आहे. बालकाचे अपहरण केल्यानंतर हे जोडपे त्याला घेऊन सोलापुरात गेले होते. पोलिसांनी सोलापुरातून बालकासह त्यांना अटक केली. मोहन अंबादास शितोळे आणि छाया मोहन शितोळे असे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही साताऱ्यातील मेढा येथील रहिवासी आहेत.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करत मुलाची सुटका

मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी मुलाचा शोध घेण्यासाठी सात वेगवेगळ्या तपास यंत्रणा राबवल्या. तब्बल 90 ते 95 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत मुलाचा शोध लावला. मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून, आरोपींना अटक केली आहे.

बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुलाला पळवले

सातारा जिल्ह्यातील रहिवासी सुषमा राहुल नाईकनवरे ही महिला आपल्या सहा वर्षाच्या मुलासह कोल्हापुरातील आदमापूर येथे बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यावेळी मंदिरातील हॉलमध्येच त्यांची राहण्याची व्यवस्था होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुषमा ही अंघोळीसाठी गेली असता दर्शनासाठी आलेल्या आरोपी जोडप्याने तिच्या मुलाला पळवून नेले.

याप्रकरणी भुदरगड पोलीस मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरवात करत मंदिर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी सीसीटीव्हीत आरोपी जोडपे मुलाला घेऊन जात असताना कैद झाले. सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला असता सदर जोडपे सोलापुरातील सांगोला तालुक्यातील जवळा येथे राहत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी जोडप्याला सोलापुरातून अटक केली. मुलाची सुटका करत त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत पुढील तपास भुदरगड पोलीस करत आहेत.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट