आधी बलात्कार, कृत्य उघडकीस येईल म्हणून हत्या, मृतदेह फ्रीजमध्ये लपवला, वाचा अल्पवयीन मुलासोबत काय घडले?

| Updated on: Nov 14, 2021 | 10:45 PM

मयत मुलगी दुकानातून घरी परतत असताना शेजाऱ्याने तिला फूस लावून घरी नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. घडला प्रकार आपल्या घरी सांगणार असे मुलीने सांगताच आरोपीने तिचा गळा आवळला. त्यानंतर मुलगी मेली आहे याची खात्री करण्यासाठी तिच्यावर चाकूने वारही केले. बलात्कार करुन हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातील खराब झालेल्या फ्रीजमध्ये लपवला.

आधी बलात्कार, कृत्य उघडकीस येईल म्हणून हत्या, मृतदेह फ्रीजमध्ये लपवला, वाचा अल्पवयीन मुलासोबत काय घडले?
crime News
Follow us on

इटावा : दुकानात सामान आणण्यासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आणि दोन दिवसांनंतर तिचा मृतदेह सापडल्याची घटना उत्तर प्रदेशात काल उघडकीस आली होती. मात्र मुलीसोबत काय घडले ? ती दोन कुठे होती? तिचा मृत्यू कसा झाला? हे प्रश्न गुलदस्त्यातच होते. आज पोलीस तपासात या घटनेचा उलगडा झाला आहे. शेजाऱ्यानेच तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला होता.

इटावा जिल्ह्यातील कोतवाली भागातील करणपुरा येथील एक अल्पवयीन मुलगी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी दुकानातून काही सामान आणण्यासाठी गेली. बराच वेळ झाला तरी मुलगी दुकानातून घरी परतली नाही म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. मात्र मुलगी कुठेच सापडली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र दोन दिवस उलटूनही मुलीचा शोध लागला नाही. त्यानंतर दोन दिवसांनी मुलीचा मृतदेह नाल्याशेजारी आढळला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

शेजाऱ्यानेच फूस लावून घरी नेले अन…

मयत मुलगी दुकानातून घरी परतत असताना शेजाऱ्याने तिला फूस लावून घरी नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. घडला प्रकार आपल्या घरी सांगणार असे मुलीने सांगताच आरोपीने तिचा गळा आवळला. त्यानंतर मुलगी मेली आहे याची खात्री करण्यासाठी तिच्यावर चाकूने वारही केले. बलात्कार करुन हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातील खराब झालेल्या फ्रीजमध्ये लपवला. त्यानंतर रात्री मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नाल्याजवळ फेकला.

एसएसपीच्या म्हणण्यानुसार, 10 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन दलित मुलीचा मृतदेह 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नाल्यातून सापडला होता. तपासात पोलिसांना अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले. ज्याच्या आधारे शेजारी अनिल शंखवार याला अटक केली. अनिल शंखवारकडून असे अनेक पुरावे सापडले आहेत, जे बलात्कार आणि हत्येमध्ये त्याचा सहभाग असल्याचे पुष्टी देतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी केवळ घटनास्थळाचीच साफ-सफाई केली नाही तर आपले कपडेही धुतले. असे असूनही, पोलिसांना आरोपीच्या घरातून असे 12 पुरावे सापडले, जे अनिलनेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची पुष्टी करते.

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलने कबुली दिली आहे की, मुलगी दुपारी दुकानातून काही वस्तू घेऊन आपल्या घरी जात होती, तेव्हा त्याने तिला आमिष दाखवून घरात बोलावले. खोलीत मुलीवर बलात्कार केला. या घटनेची माहिती कुटुंबीयांना देणार असल्याचे अल्पवयीन मुलीने सांगितल्यानंतर अनिलने दोरीने गळा आवळून खून केला. अनिलने कबूल केले आहे की, तिचा मृत्यू सुनिश्चित करण्यासाठी त्याने तिच्या पोटात वार केले आणि तिचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवून पुरावा नष्ट केला. नंतर त्याला मुलीचा मृतदेह गोणीत टाकून खंदकात टाकायचा होता, त्यावेळी परिसरातील 3-4 लोक तेथून गेले. त्यानंतर घाबरून त्याने मृतदेह नाल्यात फेकून दिला आणि तो आपल्या घरी गेला. पोलिसांनी अनिलकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि दोरी जप्त केली. यासोबतच आरोपीच्या घरातून मुलीची चप्पल, चादरी आणि चटई जप्त करण्यात आली आहे. (Accused arrested for raping and murdering a minor girl in Uttar Pradesh)

इतर बातम्या

बिलासपूर : अल्पवयीन पालकांनीच नवजात बालकाला झुडुपात फेकले, पोलीस तपासात प्रकरणाचा उलगडा

संपत्तीचा हव्यास, जन्मदात्याचाच घात; पश्चिम बंगालमध्ये डोक्यात वीट घालून मुलीकडून पित्याची हत्या