AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

crime news : वाद शेतीचा, पण शेतशिवारात पोलिसाची हत्या, आरोपीची शोधाशोध करताना पोलिसांची दमछाक

शेतीचा वाद खूप दिवसांपासून असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर दोन्हीकडून वाद टोकाला गेल्यामुळे भांडणं झालं. त्यामध्ये पोलिस जवानाची हत्या आणि वडिलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

crime news : वाद शेतीचा, पण शेतशिवारात पोलिसाची हत्या, आरोपीची शोधाशोध करताना पोलिसांची दमछाक
gondia crime newsImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 17, 2023 | 8:35 AM
Share

गोंदिया : शेतीच्या वादातून (Agricultural controversies) सिरोली (gondia shiroli) येथील पोलिस जवानाचा महागाव शेतशिवारात खून (crime news) करण्यात आला आहे. त्यामध्ये आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली असल्याने आता एकूण आरोपींची संख्या आठ झाली आहे. सहा आरोपींना 20 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेतीचा वाद विकोपाला गेला आणि पोलिसाची हत्या करण्यात आल्याने ताब्यात घेतलेल्या आठ जणांची कसून चौकशी सुरु आहे. त्याचबरोबर आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.

पोलिस जवानाच्या वडिलांना गंभीर दुखापत

शेतजमिनीच्या वादातून मंगळवारी विलास रामदास मस्के या पोलिस जवानाची हत्या करण्यात आली होती. यात मृतकाचे वडील रामदास केशव मस्के (72 , रा. सिरोली) यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर तिथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पूर्वीच सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर गुरुवारी रतनकुमार ऊर्फ बबलू जयंतकुमार पवार (38, रा. हेटी/खामखुरा व प्रभुदयाल ऊर्फ शिवदयाल परिहार (32, रा. महागाव यांना अटक करण्यात आली. आणखी दोन ते तीन आरोपी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हल्लेखोरांना कडक शिक्षा झाली पाहिजे

सगळ्या आरोपींची पोलिस कसून चौकशी करीत असून त्यामध्ये आणखी कोण होतं, त्यांना सुद्धा अटक करण्यात येणार आहे. पोलिस जवानाचा खून झाल्यापासून गावात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर हल्लेखोरांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी देखील नागरिकांनी मागणी केली आहे.

शेतीचा वाद खूप दिवसांपासून असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर दोन्हीकडून वाद टोकाला गेल्यामुळे भांडणं झालं. त्यामध्ये पोलिस जवानाची हत्या आणि वडिलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.  पोलिस जवानाची वडिलांची तब्येच व्यवस्थित झाल्यानंतर त्यांची सुद्धा चौैकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  गावात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.