अजित पवार यांनी मनसेची उडवली खिल्ली, अजितदादा म्हणाले, एवढ्या मोठ्या पक्षाने… धाबे दणाणले…

काल भाजपचे नेते त्यांना भेटले त्यांचे नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. फडणवीस यांनी बापट यांना सांगितले की कसबामध्ये काळजीचे वातावरण आहे. त्यांनी आवाहन केलं असेल. त्यामुळे बापट यांनी आजारी असतानाही मेळावा घेतला.

अजित पवार यांनी मनसेची उडवली खिल्ली, अजितदादा म्हणाले, एवढ्या मोठ्या पक्षाने... धाबे दणाणले...
अजित पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 9:49 AM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचं पारडं जड झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मनसेने भाजपला दिलेल्या पाठिंब्याची राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खिल्ली उडवली आहे. मनसे सारख्या एवढ्या मोठ्या पक्षाने पाठिंबा दिला म्हणजे आमचे धाबे दणाणले आहेत, असा मिश्किल टोला अजित पवार यांनी लगावला आहे. काल मीडियाशी संवाद साधताना अजितदादांनी ही टोलेबाजी केली.

अजित पवार यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड प्रकरणावरून राज्य सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले. जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे आधीच दाखल झाले होते. तेव्हा मी त्यांना भेटलो होतो. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. नवीन पायंडे कोणी पाडू नये. महाराष्ट्राला आपण सुसंस्कृत मानतो.

हे सुद्धा वाचा

आव्हाड यांच्या कुटुंबाबद्दल अधिकारी बोलले असतील आणि कोणी यामागे असेल तर कारवाई झाली पाहिजे. त्यामागचा मास्टरमाइंड कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे. चार दिवस सासूचे असतात तसे पुढचे चार दिवस सुनेचेही येत असतात याचं भान ठेवा, असा इशाराच अजित पवार यांनी दिला.

हे सरकारचं अपयश

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला आहे. त्यावरूनही त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. हे सरकारचे अपयश आहे. एसटी कामगारांना पगार मिळावा यासाठी अर्थमंत्री म्हणून मी तरतूद करून ठेवली होती. आता कोरोना नाही. एसटीचेही उत्पन्न होत आहे. आता कर्मचाऱ्यांनीच पाहावं. सरकार एसटी कर्मचाऱ्यांना पगार देत नाही हे सरकारचं अपयश आहे, असं ते म्हणाले.

शाह यांना येऊ द्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अमित शाह यांना येऊ द्या. ओंकारेश्वरचे दर्शन घेऊ द्या ना. मीही आज इथे आलो आहे. कोणी कुठेही जाऊ शकतो. शेवटी ही लोकशाही आहे, असं ते म्हणाले.

मी ज्योतिषी नाही

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या निकालावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. मी ज्योतिषी नाही. जो निर्णय येईल तेव्हा आपण पाहू. युक्तिवादात काही म्हणणे वेगळं आणि निर्णय येणं वेगळं आहे. जेव्हा सरकार आले त्यावेळेस मारे ऐटीत काय घोषणाबाजी केली, मिरवणूक काढली. ही नौटंकी आता तरी थांबवा, असा टोला त्यांनी लगावला.

फडणवीसांनी आव्हान केलं असेल

भाजप खासदार गिरीश बापट यांनी कसब्यातील प्रचारात भाग घेतला. त्यावरही अजितदादांनी भाष्य केलं. काल भाजपचे नेते त्यांना भेटले त्यांचे नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. फडणवीस यांनी बापट यांना सांगितले की कसबामध्ये काळजीचे वातावरण आहे. त्यांनी आवाहन केलं असेल. त्यामुळे बापट यांनी आजारी असतानाही मेळावा घेतला.

पक्षाने त्यांना आग्रह केलेला दिसतोय. बापट यांचा स्वभाव मला माहिती आहे. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ते पूर्ण करतात. देवेंद्र फडणवीस यांनी काही सांगितलं म्हणून ते बाहेर पडले असतील, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.