AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरबा कार्यक्रमामध्ये शिरले म्हणून मुस्लिम तरुणांना मारहाण?

गरबा उत्सवात शिरलेल्या दोघा तरुणांना मारहाण करताना व्हिडीओ व्हायरल! मारहाण करण्यामागचं नेमकं कारण काय?

गरबा कार्यक्रमामध्ये शिरले म्हणून मुस्लिम तरुणांना मारहाण?
का करण्यात आली तरुणांना मारहाण?Image Credit source: Twitter Video Grab
| Updated on: Sep 29, 2022 | 8:54 AM
Share

मुंबई : दोघा तरुणांना मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Social Media Viral Video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये ज्यांना मारहाण केली जातेय, ते दोघे मुस्लिम तरुण (Muslim youth beaten video) असल्याचं बोललं जातंय.  सदर घटना अहमदाबादच्या (Ahmedabad) गरबा कार्यक्रमातील असल्याचंही सांगितलं जातंय.विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम तरुणांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय.

वाईट उद्देशाने मुस्लम तरुण गरबा कार्यक्रमात शिरल्याचा दावा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला, आणि त्यांना चोप चोप चोपलं. त्यानंतर या मुस्लिम तरुणांचे कपडेही फाडण्यात आले. त्यांना उघडं करुन काही कार्यकर्ते मारहाण करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलंय. अखेर भयभीत झालेल्या तरुणांनी कार्यकर्त्यांच्या तावडीतून कसाबसा पळ काढला.

न्यूज 24 ऑनलाईनने दिलेल्या वृत्तानुसार, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मुस्लिम तरुणांबाबत आधी सांगण्यात आलं होतं. दोघे तरुण गरबा कार्यक्रमात आले असल्याची माहिती मिळाल्याने कार्यकर्ते गरबा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी मुस्लिम तरुणांना जाब विचारण्यास सुरुवात केली. तरुणांकडे काही ठोस उत्तर नसल्यामुळे अखेर संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

पाहा व्हिडीओ :

मारहाणीत एका तरुणाचं शर्ट फाटलं. त्यानंतरही कार्यकर्ते काही त्याला मारहाण करायचे थांबले नाहीत. व्हिडीओमध्ये दोघेही मार खाणारे तरुण गयावया करताना दिसून आलेत. व्हायरल झालेला व्हिडीओ अहमदाबादच्या एसपी रिंग रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या गरबा उत्सवातील असल्याचं सांगितलं जातंय.

अद्याप या घटनेप्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसही आता ऍक्शन मोडमध्ये आलेत. पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केलीय. चौकशीत कुणी दोषी आढळलं, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं सांगितलं जातंय.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडीओमध्ये काहींनी या तरुणांवर चोरीचा आरोप केलाय. तसंच गरबा खेळायला आलेल्या तरुणींची छेड काढण्याच्या उद्देशाने हे तरुण आले होते, असाही आरोप करण्यात आलाय. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....