AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जबरदस्ती दाखवायचा ते व्हिडीओ, नंतर… महिलेनं सांगितलं सैतान नवऱ्याचं धक्कादायक सत्य, तुम्हालाही बसेल धक्का!

Woman Harassment Case : अहमदाबाद येथे एका विवाहित महिलेने सासरी अमानुष छळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

जबरदस्ती दाखवायचा ते व्हिडीओ, नंतर... महिलेनं सांगितलं सैतान नवऱ्याचं धक्कादायक सत्य, तुम्हालाही बसेल धक्का!
woman harassment caseImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 27, 2026 | 4:06 PM
Share

अनेक महिलांवर स्वत:च्या घरातच अत्याचार होत असल्याचे समोर आले आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथे एका विवाहित महिलेने सासरी अमानुष छळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती तिला जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ दाखवत असे, मारहाण करत असे आणि अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असे. या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अहमदाबादमधील शाहीबाग परिसरात ही घटना घडली आहे. गर्भवती असताना लाथा मारून गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप महिलेने केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

लग्नानंतर लगेच छळाला सुरुवात

पीडित महिलेने आरोप केला की, सासरच्या मंडळींकडून तिचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. तिला जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. या त्रासाला कंटाळून तिने अहमदाबाद महिला पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.तक्रारीतील माहितीनुसार, महिलेचे लग्न 2011 मध्ये झाले होते. लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांतच सासरी तिच्याशी गैरवर्तन सुरू झाले. लग्नावेळी पतीचे यापूर्वी लग्न झाले होते आणि त्याला एक मूल असल्याची माहिती सासरच्या मंडळींनी लपवून ठेवली होती, असा आरोपही तिने केला आहे.

महिलेच्या लग्नानंतर सासू आणि दिराने हुंड्यासाठी टोमणे मारण्यास सुरुवात केली. गर्भवती असतानाही तिला पुरेशी विश्रांती न देता घरातील जड कामे करायला लावली जात होती. मुलीचा जन्म झाल्यानंतरही पतीचे वर्तन बदलले नाही. तो अनेकदा उशिरा घरी येत असे, पार्ट्यांना जात असे आणि पत्नीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गर्भपात करण्यासाठी दबाव

महिलेने पुढे सांगितले की, ती आजारी असतानाही तिला उत्तेजक औषधे देऊन संबंध ठेवण्यास भाग पाडले जात असे. नकार दिल्यास तिची बेदम मारहाण केली जात होती. काही काळानंतर ती पुन्हा गर्भवती राहिल्यावर पतीने गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला आणि न मानल्यास घटस्फोट देण्याची धमकी दिली. या सततच्या छळामुळे महिला माहेरी निघून गेली. मात्र, पती तेथे जाऊन तिला जबरदस्तीने पुन्हा सासरी घेऊन आला. सासू आणि दीरही तिला सतत अपमानास्पद वागणूक देत होते. “तू आमच्या मुलाला आवडत नाहीस, समाजामुळेच तुला ठेवले आहे. तू आमचे घर उद्ध्वस्त केले आहेस, घटस्फोट घेऊन निघून जा,” असं तिला सांगण्यात आले.

पतीचे परदेशातील महिलांसोबत व्हिडिओ कॉल

महिलेने तक्रारी म्हटले की, एका रात्री तिने पतीला परदेशातील काही महिलांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना पकडले. त्यानंतर तो त्या महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून त्याच प्रकारे संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत असे. तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतरही सासरच्या मंडळींचे वर्तन बदलले नाही. पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांबाबत तिने सासूला सांगितल्यानंतर सासूने तिच्याशी वाद घालून तिला घराबाहेर काढल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Follow Us
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप