AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CRIME NEWS | गावाकडं जाण्यासाठी … चोरला, २४ तासात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला

महाराष्ट्रात दिवसभरात क्राईमच्या घटना घडत असतात. त्यापैकी काही घटना अशा असतात की, लोक ते वाचून विचार करतात. काल एकाने छत्रपती संभाजीनगरमध्ये गावाकडे जाण्यासाठी ट्रॅक्टर चोरला होता.

CRIME NEWS | गावाकडं जाण्यासाठी ... चोरला, २४ तासात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला
| Updated on: Oct 11, 2023 | 9:43 AM
Share

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar News) शहरातील चिकलठाणा परिसरात राहणाऱ्या राजेंद्र बारबिंडे नावाच्या एका व्यक्तीने जालन्यात गावाकडे जाण्यासाठी चिकलठाणा विमानतळा मागील भिंतीलगत लावलेले रामनाथ राठोड यांचे ट्रॅक्टर चक्क ट्रॉलीसह चोरले. ट्रॅक्टर चोरी (tractor robbery) झाल्याची तक्रार मालकांनी तात्काळ पोलिसांच्या कानावर घातली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सगळीकडे चौकशी सुरु केली. पोलिसांनी ट्रॅक्टर कोणत्या दिशेला गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला २४ तासात ताब्यात घेतले. त्या चालकाकडे असणारा ट्रॅक्टर आणि ट्रॉली सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आरोपीला पोलिसांनी (crime news in marathi) ताब्यात घेतले असून त्याचा सध्या चौकशी सुरु आहे.

सराफा व्यापाराचे तिसऱ्यांदा दुकान फोडून चोरी

देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील एका व्यापाऱ्याचे तिसऱ्यांदा दुकान फोडून 1 लाख 42 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करून पंधरा दिवस झाले. तरीही मरखेल पोलिसांना चोरटे सापडले नसल्याने मरखेल पोलिसांच्या कार्यशैली बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

चोरी करताना तिघांना रंगेहात पकडले

अकोला सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जवाहनगर परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एका दुकानाचे शटर वाकवून दुकानात शिरलेल्या तिघांना पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानाने चोरी करतांना तिघांना रंगेहात पकडले आहे.

कारचं नियंत्रण सुटल्यामुळे…

पुण्याहून भोर वरंधघाटमार्गे महाडकडे जाणाऱ्या मार्गावरील साळेकरवाडी वाठार येथे भरधाव कार शेतात घुसून पलटी झाल्यानं अपघात झाला. या मार्गावरील एका वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुलटल्यानं, कार थेट रस्त्याशेजारी असणाऱ्या भात खाचरात शिरली आणि पलटी झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, कारचं मात्र नुकसान झालंय. कार महाडकडून पुण्याच्या दिशेने येतं असताना संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.