मला सोडून का गेली? राग मनात धरून बायकोसोबत अमानूष कृत्य; अंबरनाथमध्ये भयंकर घडलं!
आपल्याला सोडून गेल्याचा राग मनात धरत एका माथेफिरू व्यक्तीने आपल्याच बायकोसोबत गंभीर असं कुकृत्य केलंय. हा प्रकार समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसलाय.

Ambernath Crime News : आजकाल पती-पत्नीच्या नात्यात वितुष्ट येण्याच्या घटनांत फारच वाढ झालेली आहे. नाते टिवकता येत नसल्याने घटस्फोटांचेही प्रमाण चांगलेच वाढले आहे. दरम्यान, पत्नी-पत्नीच्या नात्यात संघर्ष निर्माण झाल्याने नंतर वेगवेगळ्या पद्धतीने सूड उगलवल्याचेही अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशीच एक अजब आणि अचंबित करणारी घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. आपल्याला सोडून गेल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीने त्याच्या पत्नीवर थेट कोयत्याने वार केले आहेत. यात संबंधित महिला तसेच तिचा दुसरा पती जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पत्नी नेमकी कुणाची? या वादातून पहिल्या पतीने आपल्या सोडून गेलेल्या पत्नीसह तिच्या दुसऱ्या पतीवर कोयत्याने वार केले आहेत.अंबरनाथमध्ये घडली आहे. यामध्ये संबंधित महिला गंभीर जखमी झाली आहे. तर या महिलेचा दुसरा पतीही जखमी असून या दोघांवरही मुंबईच्या फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमका वाद कशामुळे?
अंबरनाथ पश्चिमेला राहणारे वैशाली पितळे आणि तिचा पती महेश पितळे हे शुक्रवारी 27 जून रोजी रात्री अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदीर रोडवरील एका ज्वेलर्सच्या दुकानात दागिने खरेदी करण्यासाठी आले होते. यावेळी वैशालीचा पहिला पती लाभेश प्रभाकर म्हात्रे हा रिक्षा घेऊन तिथे आला आणि त्याने वैशालीवर धारदार कोयत्याने हल्ला केला. लाभेशने वैशालीच्या दोन्ही हातावर आणि गुडघ्यावर वार करून लाभेशने तिला गंभीर जखमी केलं.
महिलेच्या दुसऱ्या पतीवरही कोयत्याने वार
यावेळी वैशालीला वाचवण्यासाठी तिचा दुसरा पती महेश पितळे हा मध्ये पडला असता त्याच्याही हातावर लाभेश म्हात्रेने कोयत्याने वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या वैशाली आणि महेश यांनी सुरुवातीला जवळच्या शोभा हॉस्पिटल आणि तिथून संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी धाव घेतली. मात्र तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.
आरोपीला अटक, चौकशी सुरू
दरम्यान, या घटनेनंतर आरोपी लाभेश म्हात्रे हा स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शरण आला. याप्रकरणी त्याच्या विरोधात शस्त्राने दुखापत करणे, शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
