तिला महिनाभर डांबून ठेवलं…महिनाभर त्यांनी जे काही केलं ते धक्कादायक होतं, महिलेने पोलिसांत सांगितली आपबीती

सिन्नर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिला तिच्या पतिसह सिन्नर येथील माळेगाव एमआयडीसी परिसरात राहत होते. हाताला मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते.

तिला महिनाभर डांबून ठेवलं...महिनाभर त्यांनी जे काही केलं ते धक्कादायक होतं, महिलेने पोलिसांत सांगितली आपबीती
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 8:42 AM

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस (Nashik Crime News) ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक असहाय्यतेचा फायदा घेऊन सुरुवातीला धर्मांतराचे आमिष दाखविले, त्यानंतर महिनाभर एका घरात कोंडून ठेवत तिच्यावर अत्याचार (Rape Case) केल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बाब समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन सिन्नर पोलीसांनी (Nashik Police) कथित फादरसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी चौघांना अटक केली आहे. यातील एक जण फरार आहे. या घटनेने सिन्नर परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

सिन्नर पोलीसांनी या गुन्ह्यात कथित फादर राहुल लक्ष्मण आरणे, भाऊसाहेब उर्फ भावड्या यादव दोडके, रेणुका उर्फ बुटी यादव दोडके, आणि प्रेरणा प्रकाश साळवे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

सिन्नर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिला तिच्या पतिसह सिन्नर येथील माळेगाव एमआयडीसी परिसरात राहत होते. हाताला मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते.

हे सुद्धा वाचा

30 नोव्हेंबर पीडित महिला ही मुसळगाव एमआयडीसी परिसरात रोजगाराच्या शोधात फिरत होती, त्याच वेळी तिला दोन महिला भेटल्या आणि बोलू लागल्या, त्याच दरम्यान काम मिळवून देतो म्हणून त्या दोघींनी पीडित महिलेला घेऊन गेले.

सिन्नर मधील जोशीवाडी परिसरात दोन्ही राहत असल्याचे सांगितले, पीडित महिलेला घेऊन जात त्यांनी ओळख करत असतांना बुट्टी आणि प्रेरणा असल्याचे सांगितले. त्याच वेळी घरात आणि एक व्यक्ती होता.

घरात असलेल्या भाऊसाहेब बोडके उर्फ भावड्या याने महिलेशी बोलण्यास सुरवात केली. तब्येत बरी राहत नाही म्हणत आम्ही सांगतो तसं तुला करावं लागेल, तू येशूची प्रार्थना कर तुला बरं वाटेल असं सांगत आमिष दाखविले.

त्याच रात्री कथित फादर राहुल नामक व्यक्ती आला. त्याने लाल रंगाचे पाणी पाजले आणि काही पुस्तके दाखविले. त्यानंतर महिलेला गुंगी आल्याने ती झोपून गेली, त्यानंतर भावड्या याने तिच्यावर अत्याचार केले.

तब्बल महिनाभर याच घरात महिलेला डांबून ठेवण्यात आले, तिचे मंगळसूत्र आणि बांगड्या काढून काळा धागा बांधण्यात आला होता. त्यानंतर एक पुरुष आला त्याने दमदाटी करून त्यानेही शारीरिक अत्याचार केले.

याच दरम्यान पीडित महिलेला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती, त्यानंतर पत्नीच्या शोधात असलेला पतीला आलेला असतांना त्यांलाही शहर सोडून जाण्यास सांगितले होते. त्यावेळी लहान मुलासही ठेवून घेतले होते.

त्यानंतर बरेच दिवस त्यांना भीकही मागायला लावत होते. त्यानंतर पीडित महिलेच्या पतीने मित्राला घेऊन येत पत्नीची आणि मुलाची सुटका केली होती. त्यानंतर अहमदनगर येथे पीडित महिला आणि तीचं कुटुंब निघून गेले होते.

दोन-तीन दिवसांनी पीडित महिलेने आपल्या बरोबर झालेला संपूर्ण प्रकार सांगितल्याने त्यांनी थेट सिन्नर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना आपबीती सांगितली, आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.