AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्य दोनच घडीचं… बसमध्ये चढत असतानाच तो तिच्या मागून आला आणि काही क्षणात… लोकेश्वर असं का वागला?

तिरुपतीमधील एका दुःखद घटनेत, 35 वर्षीय उषा यांची त्यांच्या पती लोकेश्वरने हत्या केली आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली. लग्नाच्या 15 वर्षांनंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. पत्नीवर संशय घेण्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. लोकेश्वरने योजनाबद्धपणे उषाची हत्या केली आणि नंतर स्वतःला गळफास लावला. या घटनेने परिसरात हळहळ पसरली आहे आणि पोलिस तपास करत आहेत.

आयुष्य दोनच घडीचं... बसमध्ये चढत असतानाच तो तिच्या मागून आला आणि काही क्षणात... लोकेश्वर असं का वागला?
लोकेश्वर असं का वागला?Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jul 21, 2025 | 2:15 PM
Share

आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी त्याच्या बायकोची हत्या केली. त्यानंतर त्यानेही जीव संपवला. त्यामुळे या परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याने बायकोवर निर्दयपणे चाकू हल्ला केला. त्यात ती मरण पावली. आधी त्याने प्लान तयार केला. त्यानंतर हा हल्ला केला. तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाच्या मूळाशी जाऊन तपास करत आहेत.

तिरुपती ग्रामीणच्या मंगलम येथील बोम्मला क्वार्टर येथे ही घटना घडली. 35 वर्षाच्या उषाचं नेल्लोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाधर येथे राहणाऱ्या लोकेश्वरसोबत झालं होतं. त्यांच्या लग्नाला 15 वर्ष झाली होती. दोघांना दोन मुलेही आहेत. लग्नानंतर सर्वकाही सुरळीत सुरू होतं. पण काही काळाने दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाले होते.

कारण आलं समोर

उषा ही करकंबाडी येथील अमरा राजा फॅक्ट्रीत काम करत होती. तर लोकेश्वर बीएसएनलमध्ये कॉन्ट्रॅक्ट टेक्निशियन होता. उषा आणि लोकेश्वरमध्ये वारंवार वाद व्हायचे. लोकेश्वर पत्नी उषावर संशय घ्यायचा. हेच त्यांच्या वादाचं मुख्य कारण होतं. गेल्या महिन्याच्या 30 तारखेला दोघांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. भांडणानंतर लोकेश्वर दोन्ही मुलांना घेऊन त्याच्या आईवडिलांकडे गेला होता.

चाकूने हल्ला

दोघेही वेगळं राहू लागल्याने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर लोकेश्वरने उषाच्या हत्येचा प्लान तयार केला. उषाचा ऑपिसला जाण्या येण्याचा टाइम त्याला माहीत होता. 19 जुलै रोजी उषा पहाटे 5 वाजता ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघाली. ती कंपनीची बस पकड होती. इतक्यात लोकेश्वर पाठीमागून आला आणि त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. उषावर सपासप वार केल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

स्वत:ही संपवलं

पोलिसांच्या मते, लोकेश्वरने हत्येची पूर्ण योजना आखली होती. त्याने आधी उषाचा येण्याची वाट पाहिली. उषा घरातून निघाली तेव्हा तो तिचा पाठलाग करत बसपर्यंत आला. त्यानंतर त्याने तिच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर लोकेश्वर थेट घरी गेला आणि त्याने गळफास लावून स्वत:लाही संपवलं. पत्नीला मारल्यानंतर त्यानेही जगाचा निरोप घेतला. आईवडिलांचं छत्र हरपल्याने मुलांचे रडून रडून हाल होत आहेत. तिरुचनूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची चौकशी केली जात आहे. तसेच दोन्ही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी तिरुपती रुईया रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.