इचलकरंजीत हॉटेल व्यावसायिकाची तलवारीने हत्या, संतप्त जमावाकडून संशयित आरोपींच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ, मोठा गदारोळ

| Updated on: Oct 17, 2021 | 5:41 PM

इचलकरंजीतील एका हॉटेल व्यवसायिकाची शनिवारी (16 ऑक्टोबर) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तलवारीसह धारदार हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

इचलकरंजीत हॉटेल व्यावसायिकाची तलवारीने हत्या, संतप्त जमावाकडून संशयित आरोपींच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ, मोठा गदारोळ
इचलकरंजीत हॉटेल व्यावसायिकाची तलवारीने हत्या, संतप्त जमावाकडून संशयित आरोपींच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ, मोठा गदारोळ
Follow us on

इचलकरंजी (कोल्हापूर) : इचलकरंजीतील एका हॉटेल व्यवसायिकाची शनिवारी (16 ऑक्टोबर) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तलवारीसह धारदार हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हत्या झाली तिथेच आरोपीने हत्या करुन तलवार फेकली होती. या घटनेमुळे परिसरात प्रचंड गदारोळ झाला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या हॉटेल व्यवसायिकाच संतोष उर्फ पप्पू श्रीकांत जाधव असं नाव आहे. ते जवाहरनगर येथील गणपती कट्टा परिसरात वास्तव्यास होते.

घटनेनंतर परिसरात मोठा गदारोळ, आरोपींच्या घरांवर दगडफेक

या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार शुभम काणे याच्यासह सात जणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी हल्ल्यात वापरण्यात आलेली तलवार पडली होती. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. खूनाच्या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. जमावाने संशयितांच्या घरांवर तसेच दुकांनावर दगडफेक आणि जाळपोळ केली. तसेच आज सकाळीही स्टेशनरोड परिसरात हातगाड्यांची तोडफोड करण्यात आली.

नेमकं प्ररकण काय?

संबंधित परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संतोष उर्फ पप्पू जाधव यांचे जवाहनगर येथे हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलमधील कामगारासोबत संशयित आरोपी शुभम काणेसह त्याच्या मित्रांचा वाद झाला होता. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद झाला दाखल झाला होता. यातील काही संशयितांचा सायंकाळी पोलीस शोध घेत होते. दरम्यान रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पप्पू जाधव मित्रांसमवेत हॉटेल सोनाली परिसरातून जात असताना हल्लेखोरांनी त्यांला गाठले.

संशयित आरोपी शुभम काणे, आदित्य सुतार यांच्यासह इतर संशयितांनी तलवार, कोयता, चाकू यांचा वापर करीत जाधव यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात वर्मी घाव बसल्याने ते गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला. घटनेनंतर आरोपींनी तलवार घटनास्थळी टाकून पलायन केले. परिसरातील नागरिकांनी जाधव यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. पप्पू जाधव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

खूनानंतर परिसरात मोठा गदारोळ

आरोपींनी मृतक पप्पू जाधव यांच्या डोकं, चेहरा, दोन्ही हात, छाती अशा शरीराच्या विविध ठिकाणी तब्बल चौदाहून अधिक वार केले आहेत. जाधव यांच्या खुनाच्या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. खूनाच्या घटनेनंतर संतप्त जमावाने संशयितांची घरे लक्ष्य केली. जवाहनगर येथील मुख्य संशयित शुभम काणे याच्या घरावर दगडफेक तसेच घरातील साहित्य पेटविण्यात आले. त्यापाठोपाठ गणेनगर येथील आणखी एका संशयिताच्या घरावर दगडफेक करण्यात आली. काणे याच्या भाजीपाला विक्रीच्या दुकानाची तोडफोड करुन पेटवून देण्यात आली. त्याचबरोबर आदर्श झोपडपट्टी परिसरातील संशयिताच्या मोटरसायकलची तोडफोड करण्याबरोबर त्याच्या घरातील साहित्यही पेटवून देण्यात आले. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

परिसरातील पोलीस ठाण्याकडून जादा पोलीस कुमक मागवण्यात आली. दरम्यान पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पुढील तपासाच्या सूचना दिल्या. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत. शोकाकूल वातावरणात संतोष उर्फ पप्पू जाधव यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा :

प्रसूती होताना ओरडतेस का?, म्हणत गरोदर महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण, दौंडमधील संतापजनक घटना

बिहारमध्ये भर दिवसा महिला मॉडेलवर गोळीबार, मोना रायची प्राणज्योत मालवली, हत्येमागील रहस्य रहस्यच राहील?