AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज आनंदी आनंद झाला…., डॅडी ‘दगडी चाळीत’ परतल्यानंतर बायकोची भावूक पोस्ट

Arun Gawli wife Asha Gawli: डॅडी 'दगडी चाळीत' परतल्यानंतर बायकोची भावूक पोस्ट, 'तो' व्हिडीओ पोस्ट करत व्यक्त केल्या भावना..., सध्या सर्वत्र आशा गवळी यांच्या पोस्टची चर्चा सुरु... पोस्ट सर्वत्र व्हायरल

आज आनंदी आनंद झाला...., डॅडी 'दगडी चाळीत' परतल्यानंतर बायकोची भावूक पोस्ट
फाईल फोटो
| Updated on: Sep 06, 2025 | 1:18 PM
Share

Arun Gawli wife Asha Gawli: ज्या नावाने मोठे गँगस्टर देखील घाबरायचे, असं नाव मुंबईतल्या गल्ल्यांमध्ये एकेकाळी घेतलं जात होतं. तेव्हा मुंबईमध्ये एक दहशतीचं वातावरण होतं. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यासोबत देखील ज्यांनी टक्कर घेतली, असे अरुण गवळी… आज प्रत्येक जण त्यांना डॅडी असं म्हणतात. 17 वर्षांची शिक्षा भोगून अरुण गवळी आता पुन्हा स्वतःच्या घरी आले आहेत… अरुण गवळी इतक्या वर्षांनंतर पुन्हा घरी आल्यानंतर पत्नी आशा गवळी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

अरुण गवळी यांचं स्वागत करताना आशा गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. व्हिडीओ पोस्ट करत आशा गवळी म्हणाल्या, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला…. आज माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण कारण आज माझे पती देव डॅडी १७ वर्षाच्या त्यागानंतर आज स्वगृही परतले. खरंच आजचा हा क्षण माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या परिवारासाठी आणि डॅडीच्या चाहत्यांसाठी खूप खास आहे.

पुढे आशा गवळी म्हणाल्या, इतके वर्ष डॅडी आपल्या परिवारासोबत रहावे ह्यासाठी आपला संघर्ष करत होते.पण म्हणतात ना ‘भगवान के घर देर है अंधेर नहीं’ खर तर त्यांनी जो संयम आणि सहनशीलता राखली आणि आपल्या भगवंतावर विश्वास ठेवला त्यामुळे आजचा हा आनंदाचा क्षण द्विगुणित झाला.

दुःख काय असते हे डॅडीच समजू शकतात आणि जे त्यांनी सहन केलं ते कोणीच करू शकत नाही त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच माझी प्रार्थना आज हा आनंदाच्या क्षणी आमच्या सुखदुःखात सोबत असणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानते…. सध्या सर्वत्र आशा गवळी यांच्या पोस्टची चर्चा सुरु आहे. आशा गवळी यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे. सध्या सोशल मीडियावर आशा गवळी यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

का तुरुंगात होते अरुण गवळी?

अरुण गवळी यांची तुरुंगातून सुटका झाल्यामुळे कुटुंबियांसह अनेकांना आनंद झाला आहे. 17 वर्षांच्या तुरुंगवासानंतर, सप्टेंबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 2007 च्या कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणात अरुण गवळी यांना जामीन मंजूर केला. तुरुंगातूल भायखळ्याला परतलेल्या गवळी यांचं फुलांनी आणि उत्साहाने स्वागत करण्यात आलं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.