AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगणंही कठिण झालं… कोणी पुरुष स्पर्शही करू शकत नाही… या देशात नरकापेक्षाही वाईट अवस्थेत जगताहेत महिला

'या' देशान महिलांचं आयुष्य नरकापेक्षा देखील वाईट, डोळ्यासमोर प्राण गमावत आहेत महिला, तरीही कोणी पुरुष स्पर्शही करू शकत नाही..., थक्क करणारं वास्तव... देशात महिलांसोबत कायम होत आलाय भेदभाव...

जगणंही कठिण झालं... कोणी पुरुष स्पर्शही करू शकत नाही... या देशात नरकापेक्षाही वाईट अवस्थेत जगताहेत महिला
फाईल फोटो
| Updated on: Sep 06, 2025 | 11:54 AM
Share

आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःचं नाव मोठं करत आहे. पण काही देश असे आहेत जेथे महिलांचं आयुष्य प्रचंड खडतर आहे. आज काही देशांमध्ये रुढी परंपरेला खतपाणी दिलं जातं. जेथे महिलांचे डोळ्यासमोर प्राण जात आहेत, पण त्यांना वाचवण्यासाठी कोणी पुढाकार घेण्यास देखील तयार नाही. नुकताच अफगानिस्तान येथे विनाशकारी भूकंप आला. अशात बचाव कार्य सुरु असताना एक धक्कादायक आणि दुःखद वास्तव समोर आलं आहे. येथे ढिगाऱ्यात अडकलेल्या महिला त्यांच्या जीवासाठी विनवणी करत आहेत, परंतु शतकानुशतके जुन्या रूढीवादी परंपरांमुळे त्यांना वाचवलं जात नाही.

एका अमेरिकी रिपोर्टनुसार, कोणताही अनोळखी पुरुष महिलेला स्पर्श करु शकत नाही. ज्यामुळे महिलांचे प्राण जात आहेत. कुनार प्रांतातील आंदरलुकाक गावात, बीबी आयेशा गेल्या 36 तासांपासून ढिगाऱ्याखाली अडकली. मदत पथकाला पाहून तिने हात हलवून मदत मागितली, पण कोणताही पुरुष बचाव कर्मचारी तिच्या मदतीसाठी पुढे आला नाही. मदत पथकात महिलांची संख्या फार कमी आहे आणि याच रुढीवादी व्यवस्थेमुळे कोणताच पुरुष अधिकारी महिलांच्या मदतीसाठी पुढे येत नाहीये… त्यांच्या डोळ्यांसमोर महिलांचा मृत्यू होत आहे…

ढिगाऱ्यात अडकलेल्या एका कुटुंबाला वाचवण्यासाठी मदत पथक पोहोचल्यानंतर, त्यांनी फक्त कुटुंबातील पुरुष आणि मुलांना बाहेर काढलं. महिलांना हात देखील लावला नाही. अशात 19 वर्षीय आयेशा आणि अन्य महिला ढिगाऱ्याखाली अडकून राहिल्या… रक्त बंबाळ असलेल्या महिलांना कोणी वाचवण्याचा प्रयत्न देखील केला नाही.

मृत महिलांनाही त्यांचे कपडे खेचून बाहेर काढत आहेत…

रिपोर्टनुसार, मदत पथक मृत्यूमुखी पडलेल्या महिलांना देखील त्यांचे कपडे काढून बाहेर काढत आहेत. चुकूनही महिलांच्या शरीराला स्पर्श होणार नाही… याची काळजी पुरुष घेताना दिसत आहेत… स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईक नसल्यामुळे महिलांचे मृतदेह अशा प्रकारे बाहेर काढले जात आहेत.

उपचारात देखील भेदभाव

कुनार प्रांतातील पीडितांना मदत करणारे तहजेबुल्लाह मुहाजीब म्हणाले, जखमी महिलांशीही रुग्णालयात भेदभाव केला जात आहे. पुरुष आणि मुलांच्या उपचाराला अधिक प्राधान्य दिलं जात आहे. महिला मेडिकल स्टाफची कमतरता असल्यामुळे गंभीर जखमी असलेल्या महिलांना उपचार मिळणं कठीण झालं आहे.

सांगायचं झालं तर, हा अहवाल अधोरेखित करतो की रूढीवादी परंपरांनी मानवतेपेक्षा कसे प्राधान्य घेतले आहे, ज्यामुळे आपत्तीच्या काळातही महिलांना स्वतःचं रक्षण करावं लागत आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी