वाद सोडवायला पोलिसाला गुंडांकडून मारहाण, वाचा कुठे घडली घटना?

मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण कोकितकर हे सुरक्षेसाठी मध्यवर्ती रुग्णालयात ड्युटीवर होते. रात्री सव्वा बाराच्या सुमारास आरोपी आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे यांच्यामध्ये मध्यवर्ती रुग्णालयात वाद सुरू होता.

वाद सोडवायला पोलिसाला गुंडांकडून मारहाण, वाचा कुठे घडली घटना?
अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि हत्या प्रकरणी आरोपी अटकImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 2:20 PM

उल्हासनगर / निनाद करमरकर : वाद मिटवण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकालाच गुंडांनी मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली आहे. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात ही घटना घडली. कर्तव्यावर असलेल्या एका पोलिसाला दोन गुंडांनी मारहाण केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मारहाणीची ही घटना मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आला आहे. आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घडली घटना

मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण कोकितकर हे सुरक्षेसाठी मध्यवर्ती रुग्णालयात ड्युटीवर होते. रात्री सव्वा बाराच्या सुमारास आरोपी आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे यांच्यामध्ये मध्यवर्ती रुग्णालयात वाद सुरू होता. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण कोकितकर यांनी या वादात हस्तक्षेप केला असता, दोन्ही आरोपींनी त्यांच्यावर हात उगारला आणि त्यांचा शर्ट पकडला.

दोन्ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी

या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांचाही पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड असून, त्यानुसार त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

इचलकरंजीत जुन्या वादातून दोन तरुणांमध्ये हाणामारी

जुन्या वादातून दोन तरुणांमध्ये हाणामारी झाल्याची घटना इचलकरंजीत घडली आहे. या तरुणांमध्ये याआधीही मारहाणीची घटना घडली होती. स्वप्निल बन्ने आणि निखिल नाईक अशी हाणामारी करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. हाणामारीत दोघेही तरुण जखमी झाले असून, दोघांना उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.