AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : तो मला वर्षभरापासून त्रास.., एनजीओच्या सेशनमध्ये ७ वर्षांच्या बालिकेने केलेल्या खुलाशाने पालकही हादरले !

ज्याला भावासारखं समजत होती तोच लहानग्या मुलीचं शोषण करत असल्याची माहिती समोर येताच तिच्या पालकांना तत्काळ याची माहिती देण्यात आली. मात्र प्रथम त्यांनी पोलिसांकडे जाण्यास टाळाटाळ केली.

Mumbai Crime : तो मला वर्षभरापासून त्रास.., एनजीओच्या सेशनमध्ये ७ वर्षांच्या बालिकेने केलेल्या खुलाशाने पालकही हादरले !
| Updated on: Sep 07, 2023 | 12:23 PM
Share

मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : मुलांना ‘गुड टच आणि बॅड टच’चे (good touch, bad touch)महत्व समजावण्यासाठी शाळेतून एका एनजीओचे सेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र त्या दरम्यान एका ७ वर्षीय विद्यार्थिनीच्या खुलाशाने सर्वच चक्रावले. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने वर्षभरापासून केलेल्या विनयभंगाबद्दल (molestation) तिने दिलेल्या माहितीमुळे शिक्षकही हादरले. यानंतर टिळक नगर पोलिसांनी स्टॉक एक्स्चेंजमध्ये काम करणाऱ्या 28 वर्षीय तरूणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील एका शाळेमध्ये एका एनजीओतर्फे मुलांसाठी सेशन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांना चांगला व वाईट स्पर्श ओळखण्याबाबत माहिती देण्यात आली. तेव्हा एनजीओच्या एका महिला कार्यकर्त्याला पीडित मुलीचं वागणं थोड वेगळ वाटल्याने तिला संशय आला. तिने त्या मुलीला बाजूला नेले आणि विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. तेव्हा त्या मुलीने खुलासा केला की शेजारी राहणारा मुलगा तिला नेहमी अयोग्यरित्या स्पर्श करत असे आणि सारखं उचलून घेत असे, जे तिला आवडत नसे.

अवघ्या ७ वर्षांच्या त्या मुलीच्या या खुलाशानंतर तिच्या पालकांना याबाबत तातडीने माहिती देण्यात आली. मात्र आपली मुलगी त्या मुलाला दरवर्षी राखी बांधते, असे सांगत त्यांनी पोलिसांत जाण्यास टाळाटाळ केली. अखेर त्या एनजीओतर्फेच घाटकोपर पोलिसांकडे लेखी तक्रार पाठवण्यात आली. त्यांनी हे प्रकरण टिळक नगर पोलिसांकडे सोपवले. दरम्यान हे गैरकृत्य करणाऱ्या तरूणाला ताब्यात घेण्यात आले आहे. हे प्रकरण तांत्रिक स्वरूपाचे असून आरोपांना पुष्टी देण्यासाठी पुरावे शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?