CCTV : चालकानं छेड काढल्यानं धावत्या रिक्षातून तरुणीची उडी! औरंगाबाद हादरलं

ठाण्यानंतर आता औरंगबाद जिल्ह्यातही रिक्षा चालकानं संतापजनक कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

CCTV : चालकानं छेड काढल्यानं धावत्या रिक्षातून तरुणीची उडी! औरंगाबाद हादरलं
संतापजनक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 8:17 AM

औरंगाबाद : ठाण्यानंतर (Thane News) आता औरंगाबादेत (Aurangabad Crime News) रिक्षातून जाणाऱ्या एका मुलीची रिक्षा चालकाने छेड काढण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने त्यामुळे धावत्या रिक्षातूनच उडी टाकली. या घटनेत मुलगी रस्त्यावर कोसळली आणि गंभीर जखमी झाली. यानंतर रिक्षा चालकाने मुलीची मदत करण्याऐवजी तिथून पळ काढला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही (CCTV Video) कैद झालीय.  औरंगाबाद शहरातच घडलेल्या या प्रकराने तीव्र संताप व्यक्त केला जातोय. तसंच मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झालाय.

एक अल्पवयीन मुलगी क्लासवरुन परतत होती. त्यावेळी रिक्षातून प्रवास करताना रिक्षा चालकाने पीडित मुलीशी अश्लिल संभाषण केल्याचा आरोप करण्यात आलाय. भयभीत झालेल्या मुलीनं रिक्षा चालक छेड काढत असल्यानं धावत्या रिक्षातूनच उडी टाकली.

हे सुद्धा वाचा

धावत्या रिक्षातून उडी टाकल्यानं मुलीच्या डोक्याला गंभीर मार लागला. ज्या वेळी मुलीने रिक्षातून उडी टाकली, तेव्हा रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. मागून येणाऱ्या वाहनांना आणि दुचाकीखाली ही मुलगी येण्याची भीती होती. मात्र मागील वाहनांनी प्रसंगावधान राखल्यानं थोडक्यात मोठा अनर्थ टळला.

पाहा व्हिडीओ :

औरंगाबाद शहरातील शिल्लेखाना चौक ते शिवायी हायस्कूल दरम्यान सदर घटना घडली. 13 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाला अटकही केलीय. सय्यद अकबर सय्यद हमीद असं रिक्षा चालकाचं नाव आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी रिक्षा चालकाला क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेतलं. सध्या त्याची कसून चौकशी केली जातेय. तर गंभीर जखमी मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या संपातजनक घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी महिलांना महत्त्वाचं आवाहन केलंय. महिलांनी रिक्षातून किंवा एकटं असताना इतर कोणत्याही वाहनातून प्रवेश करताना आधी संबंधित वाहनाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढावा, असं आवाहन पोलिसांनी केलंय. सुरक्षेच्या दृष्टीने महिलांनी ही सतर्कता बाळगावी, असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आलाय.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.