AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Siddique Murder : …तर वाचले असते बाबा सिद्दीकी, समजल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तही संतापले

Baba Siddique Murder : सगळ्या राज्याला बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाने हादरवून सोडलय. आरोपींनी सर्वांसमक्ष बेछूट गोळीबार केला. आता या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना या बद्दल समजल्यानंतर त्यांनी सुद्धा संताप व्यक्त केला.

Baba Siddique Murder : ...तर वाचले असते बाबा सिद्दीकी, समजल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तही संतापले
Baba Siddique
| Updated on: Oct 15, 2024 | 9:00 AM
Share

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी दसऱ्याच्या दिवशी निर्घृण हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेने सगळ्या मुंबईला हादरवून सोडलय. बऱ्याच वर्षांनी मुंबईत इतकी मोठी राजकीय हत्या झाली आहे. या हत्या प्रकरणात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या टाळता आली असती. या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित शुभम लोणकरला पोलिसांनी जाऊ दिलं नसतं, तर कदाचित ही हत्या टळली असती. सलमान खानच्या फ्लॅटवर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी शुभम लोणकरला ताब्यात घेतलं होतं. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुभमची चौकशी केली होती. आज टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

सलमान खान गोळीबार प्रकरणातील संशयिताला आसरा दिला म्हणून गुन्हे शाखेने शुभमची चौकशी केली होती. पण सबळ पुरावे नसल्यामुळे त्यावेळी गुन्हे शाखेला शुभम लोणकरला सोडाव लागलं होतं. आता या प्रकरणात शुभमच नाव आल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी शुभमची चौकशी करणाऱ्या क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. शुभम लोणकरला लष्करात जायचं होतं. पण 2018-19 साली जैसलमेर येथे लष्करी भरतीमध्ये तो अपयशी ठरला होता. यावर्षी मे महिन्यात बिश्नोई गँगच्या सदस्यांनी वांद्रे येथील सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली होती.

शुभमने बाहेर राहून काय केलं?

विवेक गुप्ता, सागर पाल, हरपाल सिंग ऊर्फ हॅरी, रफीक चौधरी आणि बनवारीलाल गुजर. सहावा आरोपी अनुज थापचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला. यांच्या चौकशीत शुभम लोणकरच नाव समोर आलं होतं. त्याच्यावर आरोपीला आश्रय दिल्याचा आरोप होता. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने शुभमची कसून चौकशी केली होती. पण सबळ पुराव्याअभावी त्याला गुन्ह्यामध्ये अडकवता आलं नाही. यामुळेच शुभम लोणकरला बाहेर राहून गुन्ह्यामध्ये सक्रीय होता आलं. बिश्नोई गँगसाठी त्याने नव्या शूटर्सची भरती केली.

आरोपी भंगाराच्या दुकानात काम करायचे

शुभम लोणकर बिश्नोई गँगच्या कसा संपर्कात आला? ते पोलीस शोधण्याच्या मागे लागले आहेत. शुभम लोणकरनेच सोशल मीडियावर टि्वट करुन बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकीच्या हत्येचा दावा केला. सध्या फरार असलेला झिशान अख्तर बिश्नोई गँग आणि शुभममध्ये दुवा असू शकतो. पोलिसांनी शुभमचा भाऊ प्रविणला अटक केली आहे. पुण्यात लोणकरची डेअरी होती. त्याच्यापुढे भंगाराच दुकान होतं. धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम हे त्या भंगार दुकानात काम करायचे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...