AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलिंगड विक्रीआडून करायचा लहान बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा; बदलापूर हादरलं

आरोपीच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲपवर काही नवजात बालकांचे फोटो आणि विक्री दर आढळले आणि पोलीसही हादरले. तसेच बालकांच्या विक्रीसाठी पाच ते सात लाख रुपयांपर्यंत किंमतींचा उल्लेखही त्याच्या मोबाईलमधील चॅटमध्ये सापडले.

कलिंगड विक्रीआडून करायचा लहान बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा; बदलापूर हादरलं
कलिंगड विक्रीच्या आडून लहान बाळांच्या विक्रीचा गोरखधंदाImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 05, 2025 | 10:31 AM
Share

बदलापूरमध्ये एकाहून एक भयानक गुन्ह्यांच्या घटना उघडकीस येत आहेत. कॅन्सरच्या उपचारांसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर एका 27 वर्षांच्या तरूणाचे अत्याचार केल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. बिहारमधून उपचारांसाठी आलेल्या मुलीला भाड्याने घर घेऊन देणाऱ्या , आधार देण्याचं नाटक करणाऱ्या नराधमानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस आला असून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. लोकांमधील माणुसकी, सदसदविवेकबुद्धी नावाचा प्रकार संपुष्यात आला की काय अशी शंका आता प्रत्येकाच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. हे सगळं कमी की काय म्हणून याच बदलापूरमधून आणखी एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे.

कलिंगड विकणारा, साधासुधा दिसणाऱाय मनुष्य,याच कलिंगड विक्रीच्या आडून भयानक कृत्य करत होता. चक्क नवजात बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा करत असल्याचे समोर आले असून बदलापूरमध्ये फॉरेस्ट विभागाने या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तुषार साळवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

कचरा टाकण्यावरून वाद, आणि उघड झालं भयानक सत्य

बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अंबरनाथ पश्चिमेच्या फॉरेस्ट नाका परिसरात कलिंगड विकणाऱ्या एका तरुणाला कचरा टाकण्यावरून फॉरेस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हटकलं असता त्याने या कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत त्याचा व्हिडिओ चित्रित केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी या तरुणाला वनविभागाच्या कार्यालयात बोलावून त्याने हा व्हिडिओ कुठे कुठे फॉरवर्ड केला आहे, हे पाहण्यासाठी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात लहान बाळांच्या खरेदी-विक्री संदर्भात केलेली चॅटिंग वनविभागाचे अधिकारी वैभव वाळिंबे यांना आढळून आली. त्यानुसार त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलिंगड विक्रेता तरुण तुषार साळवे याच्या विरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

हा एक सराईत आरोपी असून यापूर्वीही अशाच गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती अशी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी तुषार साळवे याला २०२३ मध्ये देखील ठाणे नगर पोलीस ठाण्यात अशाच बाळ विक्रीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. या प्रकरणात जामीन झाल्यानंतर पुन्हा त्याने तोच धंदा सुरू केला होता. मात्र वनविभागाच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसाची पोलिस कोठडीत सुनावली. वन अधिकारी वैभव वाळिंबे यांच्या सतर्कतेमुळे बालकांची तस्करी उघडकीस आली असून या प्रकरणाचा तपास सध्या सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांच्याकडून सुरू आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.