
बंगळुरूच्या एका हॉटेलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका ओयो हॉटेलमध्ये महिलेचा तिच्या बॉयफ्रेंडने चाकू भोसकून खून केलाय. (फोटो सौजन्य- मेटा एआय, सांकेतिक फोटो)

माथेफिरूने हा खून शुक्रवारी (6 जून) केला. मात्र दोन दिवसांनी या खुनाची माहिती इतरांना झाली. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही 33 वर्षांची असून तिचे नव हरिणी असे आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय, सांकेतिक फोटो)

तर खुनाचा आरोप असणाऱ्या तरुणाचे वय अवघे 25 वर्षे असून त्याचे नाव यश असे आहे. दोघेही बंगळुरूमध्ये पश्चिम उपनगरातील केंगेरी या भागात राहायचे. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचा बॉयफ्रेंड हा तिच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान आहे. तसेच मृत महिलेला दोन मुलं आहेत. (फोटो सौजन्य- मेटा एआय, सांकेतिक फोटो)

ही हत्या ओयो हॉटेलमध्ये झाली. माथेफिरून तरुणाने हरिणी नावाच्या महिलेच्या पोटात चाकू भोसकून तिची हत्या केली. सुब्रमण्यपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या खुनाची चौकशी होत आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय, सांकेतिक फोटो)

मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला तरुणासोबतचं नातं संपवू पाहात होती. ते दोघेही एकमेकांना एका महिन्यापासून ओळखत होते. ती महिला तरुणाला स्वत:पासून दूर करू पाहात होती. याच कारणामुळे रागाच्या भरात तरुणाने तिच्यावर चाकुहल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय, सांकेतिक फोटो)