AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी वरात काढत असाल तर एकदा ही बातमी वाचा, नाहीतर सगळं सोडून तुम्हालाही पळावं लागेल, कारण काय ?

बुलढाण्यात लग्नाच्या वरातीवर मधमाशांनी हल्ला केल्याने नवरदेवासह 100 हून अधिक वऱ्हाडी जखमी झाले. यानंतर नवरदेवावर रुग्णालयात उपचार करुन विवाह सोहळा पार पाडण्यात आला.

नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी वरात काढत असाल तर एकदा ही बातमी वाचा, नाहीतर सगळं सोडून तुम्हालाही पळावं लागेल, कारण काय ?
बुलढाण्यात वऱ्हाड्यांवर मधमाशांचा हल्लाImage Credit source: TV9
| Updated on: Mar 01, 2023 | 1:07 PM
Share

बुलढाणा / गणेश सोळंकी : लग्नासाठी चाललेल्या वऱ्हाडावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना बुलढाण्यात घडली. लावण्यासाठी परण्या काढत वरात घेऊन लग्नस्थळी जाणाऱ्या वऱ्हाडावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना 27 फेब्रुवारीला सायंकाळी सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथे घडली. या घटनेत 100 हून अधिक वऱ्हाड्यांसह नवरदेव जखमी झाला. नवरदेवावर खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर सायंकाळी 8 वाजता काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला.

दुसरबीड येथील गीतांजली मंगल कार्यालयात देव्हरे आणि बिथरे कुटुंबाचा 27 फेब्रुवारी रोजी विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. सिंदखेड राजा तालुक्यातील किनगावराजा येथील फुलसिंग देव्हरे यांचा मुलगा मंगेश फुलसिंग देव्हरे याचा शुभ विवाह दुसरबीड येथीलच बबन बिथरे यांची मुलगी गंगा बबन बिथरे हिच्यासोबत आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान, किनगावराजा येथून नवरदेवाची वऱ्हाडी मंडळी दुसरबीड येथे पोहोचली. मंगल कार्यालयात सर्व सोपस्कार आणि विधी झाल्यावर सायंकाळी परण्याची वरात वाजत गाजत मंगल कार्यालयातून निघाली. त्यानंतर सायंकाळी सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास ही वरात लग्न लावण्यासाठी परत मंगल कार्यालयाकडे चालली होती. यावेळी या मार्गावरील बाभूळ बनात बँडच्या वाद्याच्या आवाजाने झाडावरील आग्या मोहोळाचे पोळे त्या वऱ्हाडी मंडळीच्या अंगावर पडले.

अचानक घडलेल्या ह्या घटनेत मधमाशांनी वऱ्हाडी मंडळी तसेच नवरदेवावर हल्ला चढवला. त्यात वऱ्हाडी मंडळी तर बाधित झालीच पण नवरदेव सुद्धा जखमी झाला. एवढेच नव्हे तर नवरदेव ज्या घोड्यावर स्वार होऊन जात होता. त्या घोड्याला आणि त्याची लगाम खेचणाऱ्या मालकाला सुद्धा मधमाशांच्या हल्ल्याचा सामना करावा लागला. यावेळी प्रसंगावधान राखत नवरदेव मंगेश ह्याला जवळच्या एका खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले. नवरदेवावर उपचारानंतर विवाहसोहळा पार पडला.

शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.