AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime News : व्यसनमुक्ती केंद्रातून पळून आलेल्या जावयाला पिकअपमध्ये घेतलं, जावयाला असा बडवला की त्याचा जागीचं…

Crime News : दारु सोडवी म्हणून जावयाला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले, तिथून पळून आला, मग बेदम मारहाण, नंतर जे घडलं त्यानं गाव हादरलं

Crime News : व्यसनमुक्ती केंद्रातून पळून आलेल्या जावयाला पिकअपमध्ये घेतलं, जावयाला असा बडवला की त्याचा जागीचं...
CRIME NEWS
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jan 31, 2023 | 9:17 AM
Share

भंडारा : गोसे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मृतदेह आढळलेल्या तरुणाच्या मृत्यूचे रहस्य उलगडले असून मित्रांच्या मदतीने मेव्हण्याने भावजीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या अड्याळ पोलिस स्टेशन (Adyal police station) अंतर्गत पळसगाव (palasgaon) येथे ही घटना घड़ली आहे. या प्रकरणी चौघांना अटक केली असून दारूडा जावई बहिणीला त्रास देत असल्याने खून केल्याची कबुली मेव्हण्याने दिली आहे. मंगेश प्रेमलाल वाढई (34, रा. पळसगाव ता. साकोली) असे मृताचे नाव आहे.

मेव्हणा विलास केवलदास ऊके (30) रा. भोसाटाकळी, प्रमोद नामदेव साकोरे (35) रा. खोकरला, जितेंद्र मोतीराम अंबादे (35) रा. शिंगोरी, सुरेंद्र प्रभाकर आगरे (32) रा. मानेगाव अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.

27 जानेवारी रोजी मंगेशचा मृतदेह पवन तालुक्यातील गोसे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये चकारा चिचाळ मार्गावरील एका पुलाखाली आढळून आला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. मंगेशला दारूचे व्यसन असल्याने तो पत्नीचा नेहमी छळ करीत होता. जावयाने दारू सोडवावी म्हणून मेव्हण्याने विविध प्रयत्न केले. जावई मंगेशला 19 डिसेंबरला भंडारा येथील एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी पाठविले. मात्र 22 जानेवारी रोजी मंगेश पळसगाव येथे पळून आला.

त्यानंतर मेव्हणा विलास ऊके मित्रांसोबत पळसगाव येथे 25 जानेवारीला आला. मंगेशला पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन गेले. मंगेशला त्याचा मेव्हणा व मित्रांनी दारू सोडविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जात असल्याचे घरी सांगितले. त्यानंतर त्याला एका पिकअप वाहनातून नेण्यात आले. मात्र रस्त्यात या वाहनातच जबर मारहाण करण्यात आली. त्यात तो मृत्युमुखी पडला. पुरावा नष्ट करण्यासाठी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये फेकून दिल्याचे सांगितले आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच