सुरक्षा व्यवस्थेतचं कडं तोडून पाकिस्तानात मशिदीत स्फोट; 61 जण जागीच ठार…

महादेव कांबळे, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 31, 2023 | 12:24 AM

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. अफगाणिस्तानमध्ये मारला गेलेला टीटीपी कमांडर उमर खालिद खुर्सानी याच्या मृत्यूचा बदला म्हणून हा आत्मघातकी हल्ला झाला आहे.

सुरक्षा व्यवस्थेतचं कडं तोडून पाकिस्तानात मशिदीत स्फोट; 61 जण जागीच ठार...

कराचीः पाकिस्तानमधील अशांत असणाऱ्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावरमधील उच्च पातळीवरची सुरक्षा असलेल्या भागात सोमवारी एका तालिबानी आत्मघाती तालिबानी दहशतवाद्याने  दुपारच्या नमाजावेळी स्वत:ला उडवून दिल्याने येथील 61 नागरिक जागीच ठार झाले. तर 150 हून अधिक जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी स्फोट घडवून आणला गेला त्याठिकाणी दुपारी 1.40 च्या सुमारास, पोलिस लाइन्स क्षेत्राजवळ दुपारची नमाज अदा करत होते.

त्यावेळी पुढच्या रांगेत बसलेल्या आत्मघातकी तालीबानी स्फोटकांचा त्याच ठिकाणी स्फोट केला. स्फोटकांचा स्फोट झाल्यानंतर मशिदीचे छत उपासकांवर पडल्याने त्यातच अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ठार झालेल्यांमध्ये पोलीस, लष्कर आणि बॉम्बशोधक पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.

लेडी रिडिंग हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत 61 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 150 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बहुतांश पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा अधिकारी जास्त आहेत.

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमध्ये मारला गेलेला टीटीपी कमांडर उमर खालिद खुर्सानी याच्या मृत्यूचा बदला म्हणून हा आत्मघातकी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, स्फोटामुळे मशिदीचा काही भाग कोसळला असून अनेक लोक त्याच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तर बचाव मोहिमेत असलेले अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या आमचे लक्ष बचाव कार्यावर आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे.

पोलीस स्फोटाचा तपास करत आहेत आणि बॉम्बर उच्च सुरक्षा असलेल्या मशिदीत कसा घुसला हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिस लाईन्सच्या आत फॅमिली क्वार्टर असल्याने बॉम्बस्फोट घडण्यापूर्वी तालीबानी पोलिस लाईन्समध्ये राहत असावा, अशी भीती त्यांनी व्यक्त केली जात आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI