नवरा शहजाद अक्षरक्ष: जमिनीवर लोळला, रडला पण आयशा मागे फिरली नाही, हिंदू बॉयफ्रेंडसाठी उचललं पाऊल
नवरा शहजाद जमिनीवर अक्षरक्ष: लोळून, लोळून रडत होता. जोरजोरात आरडा-ओरडा चाललेला. पण आयशा मागे फिरली नाही. बिहारच्या बेगूसरायमधील ही घटना आहे.

‘पती, पत्नी आणि वो’ च्या प्रकरणात सदर हॉस्पिटलमध्ये एका हाय वोल्टेज ड्रामा पहायला मिळाला. पत्नीने बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं, त्यावरुन पतीने खूप गोंधळ घातला. पतीच म्हणणं होतं, मला माझी पत्नी पाहिजे. पत्नीच म्हणणं होतं की, नवरा मला मारहाण करतो. म्हणून मी माझ्या वर्ग मित्राबरोबर लग्न केलय. आता मी त्याच्यासोबतच राहणार. पत्नी एवढं बोलून तिथून निघून गेली. त्यानंतर नवरा जमिनीवर अक्षरक्ष: लोळून, लोळून रडत होता. जोरजोरात आरडा-ओरडा चाललेला. पण ती मागे फिरली नाही. बिहारच्या बेगूसरायमधील ही घटना आहे.
साहेबपुर कमाल ठाणा क्षेत्रातील सन्हा येथे राहणारी आयशा खातून आणि शहजादच 2020 साली धूमधडाक्यात लग्न झालेलं. लग्नानंतर दोघांमध्ये भांडणं सुरु झाली. वाद इतका वाढला की, नवरा-बायको दोघे ऐकमेकाशी व्यवस्थित बोलतही नव्हते. त्याचवेळी आयशा वर्गमित्र बिकेश कुमार पासवानाच्या संपर्कात आली.
दोघांमध्ये रोज बोलणं सुरु
दोघांमध्ये रोज बोलणं सुरु झालं. आयशाने तिला नवऱ्याकडून होणारा त्रास बिकेशला सांगायला सुरुवात केली. याबद्दल शहजादला कळल्यानंतर त्याने घरात आयशाला मारहाण सुरु केली. पत्नीच प्रेम प्रकरण सुरु झाल्यामुळे तो तिला घेऊन दिल्लीला निघून गेला. तिथेही शहजादकडून मारहाण सुरु होती, असं आयशाने सांगितलं.
नशा करुन चुकीच काम
लग्नाआधी शहजादने सांगितलेलं की, दिल्लीत त्याचं घर आणि जमीन आहे. पण हे सगळ खोटं होतं. दिल्लीला गेल्यानंतर मी कधी बिकेशशी बोलली नाही, पण शहजादने माझ्यावर खोटे आरोप करुन मला मारहाण करायचा. नवरा नशा करुन चुकीच काम करायचा. यालाच कंटाळून आयशाने पुन्हा बिकेशशी बोलायला सुरुवात केली. एकदिवस या सगळ्याला कंटाळून ती बिकेशनकडे निघून गेली.
आयशाला बिकेशसोबत बघितलं
शहजादने आयशा कुठे आहे, ते शोधून काढलं. सदर हॉस्पिटल बाहेर त्याने आयशाला बिकेशसोबत बघितलं. तिथे पत्नी, पत्नी आणि वो चा ड्रामा सुरु झाला. मी जर शहजादकडे परत गेली, तर तो मला आणि माझ्या मुलीला मारुन टाकेल. मी बिकेशशी लग्न केलय. मी त्याच्यासोबतच राहणार. हे ऐकून शहजाद रडू लागला. त्याने खूप गोंधळ घातला. पण आयशा तिच्या निर्णयावर ठाम राहिली व तिथून निघून गेली.
