आजोबांच्या श्राद्धाला बारबाला नाचवल्या, हवेत गोळीबार; एका नातवाला बेड्या, दुसरा पसार

| Updated on: Dec 26, 2021 | 1:01 PM

आजोबांच्या श्राद्धानंतर रात्री उशिरा नातवंडांनी गोळीबार केला. राजेश यादव आणि मिथिलेश यादव अशी आरोपींची नावं आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार राजेशच्या आजोबांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. श्राद्धाचं 'सेलिब्रेशन' करण्यासाठी नातवाने चक्क बारबालांना नाचायला बोलावलं

आजोबांच्या श्राद्धाला बारबाला नाचवल्या, हवेत गोळीबार; एका नातवाला बेड्या, दुसरा पसार
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशात मिरवणुकीतील गोळीबार काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. जल्लोषी गोळीबारात अनेक जण आपल्याकडे असलेल्या शस्त्रांचं ओंगळवाणं प्रदर्शन करताना दिसतात. मात्र उत्साहाच्या भरात केलेले गोळीबार इतरांच्या जीवावरही बेतण्याची शक्यता असते. बिहारमध्ये चक्क आजोबांच्या श्राद्धावेळी नातवाने सेलिब्रेशन केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी नातवाने बारबालाही नाचवल्या. एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात बंदूक घेऊन त्याने एकामागून एक गोळीबार केला. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठली आहे.

काय आहे प्रकरण?

आजोबांच्या श्राद्धानंतर रात्री उशिरा नातवंडांनी गोळीबार केला. राजेश यादव आणि मिथिलेश यादव अशी आरोपींची नावं आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार राजेशच्या आजोबांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. श्राद्धाचं ‘सेलिब्रेशन’ करण्यासाठी नातवाने चक्क बारबालांना नाचायला बोलावलं. यावेळी नातवाने जल्लोषी गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. पोलिसांनी आपणहून या घटनेची दखल घेत तपास सुरु केला आहे.

नातू रेकॉर्डवरील गुन्हेगार

एसपी अरविंद कुमार यांनी बारबालांचा डान्स आयोजित केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. व्हिडीओ नीट पाहिल्यानंतर अनधिकृत शस्त्रातून गोळीबार केल्याचं स्पष्ट झालं आहे. राजेश यादव हा कुख्यात गुन्हेगार आहे. अर्धा डझनहून अधिक प्रकरणात पोलीस त्याच्या मागावर आहेत. राजेश यादव आणि मिथिलेश यादव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दोघांनीही अनेक वेळा तुरुंगवारी केली आहे. पोलिसांनी मिथिलेशला बेड्या ठोकल्या असून फरार राजेशचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींच्या घरातून अवैध शस्त्रास्त्र सापडली आहेत. पोलिसांनी आरोपीच्या घरातून बंदूक, जिवंत काडतुसंही जप्त केली आहेत. या प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. सरस्वती पूजेच्या नावाखाली अनेक गुन्हेगार बारबालांना बोलावून शस्त्रांचं ओंगळवाणं प्रदर्शन करतात, मात्र पोलिसांनी आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही, असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

शिक्षकाची चोरीची ‘कला’, सोलापुरात Art Teacher पेट्रोल चोरताना रंगेहाथ

 आधी तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, मग अल्पवयीन तरुणीवर गँगरेप, पुण्यात खळबळ

पोलीस भरती परीक्षेत ‘मुन्नाभाई’ स्टाईल कॉपीला मदत, औरंगाबादेतील पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन