मास्तराच्या घरावर आयटीचा छापा, सोनं संपत्ती बघून अधिकारीही चक्रावले

| Updated on: Nov 26, 2021 | 2:11 PM

माध्यमिक शाळेतील शिक्षकाविरुद्ध आयकर विभागात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षकाच्या घरावर छापा टाकला. शिक्षकाकडून कोट्यवधी रुपयांच्या रोकडीसह अनेक किलो सोने-चांदीही सापडली आहे.

मास्तराच्या घरावर आयटीचा छापा, सोनं संपत्ती बघून अधिकारीही चक्रावले
आयकर विभागाने छापा टाकलेला शिक्षक
Follow us on

पाटणा : बिहारमध्ये भ्रष्टाचाराच्या चुलीवर शिजवलेली पंचपक्वान्न खाण्यात मश्गूल असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध आयकर विभागाने मोहीम उघडली आहे. यामध्ये नुकताच माध्यमिक शाळेतील एक शिक्षक जाळ्यात सापडला. त्याची मालमत्ता पाहून तर आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले. हे प्रकरण नालंदा जिल्ह्यातील थरथरी ब्लॉकमधील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या नीरज कुमार शर्मा यांच्याशी संबंधित आहे.

काय आहे प्रकरण?

माध्यमिक शाळेतील शिक्षकाविरुद्ध आयकर विभागात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षकाच्या घरावर छापा टाकला. शिक्षकाकडून कोट्यवधी रुपयांच्या रोकडीसह अनेक किलो सोने-चांदीही सापडली आहे. सध्या आयकर अधिकाऱ्यांनी शिक्षकाला एक महिन्याची मुदत दिली असून संपूर्ण मालमत्तेचा तपशील मागवला आहे.

बँकेच्या लॉकरमध्येही घबाड

इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाटणा येथील बहादूरपूर भागात शिक्षक नीरज कुमार यांच्या एसबीआय शाखेच्या लॉकरचीही झडती घेतली. यावेळी लॉकरमधून टीमला एक कोटी रुपये रोख आणि दोन किलो सोन्याचे घबाड मिळाले. लॉकरमध्ये सोन्याच्या चार विटा सापडल्या असून दोन हजारांची रोख रक्कम सापडली आहे.

कागदपत्रांचा हिशोब नाही

आयकर विभागाचे अधिकारी सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक नीरज कुमार शर्मा हे नवरचना कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक राकेश कुमार यांचे नातेवाईक असून जप्त केलेली मालमत्ता ही बांधकाम कंपनीच्या मालकाची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कोणत्याही गोष्टीचा कागदी पुरावा शिक्षकाकडून सादर केला गेलेला नाही. सरकारी शिक्षकाकडे एवढी संपत्ती कुठून आली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या आयकर विभागाचे अधिकारी करत आहेत.

संबंधित बातम्या :

डॉक्टरची एक लाखाची ऑफर, डोंबिवलीत गणपती मंदिराजवळ आईने पोटचं बाळ सोपवलं, पण…

दहावीतील विद्यार्थिनीवर 25 वर्षीय तरुणाचे वार, डोकं धडावेगळं होऊन जागीच गतप्राण

शाळेतच शिक्षिकेचा विनयभंग करुन अश्लील कृत्य, विज्ञानाच्या शिक्षकाला अटक