शाळेतच शिक्षिकेचा विनयभंग करुन अश्लील कृत्य, विज्ञानाच्या शिक्षकाला अटक

11 नोव्हेंबर रोजी एका वरिष्ठ माध्यमिक शाळेतील शिक्षिकेसोबत विनयभंगाचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तिच्या सहकारी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

शाळेतच शिक्षिकेचा विनयभंग करुन अश्लील कृत्य, विज्ञानाच्या शिक्षकाला अटक
प्रातिनिधिक फोटो


जयपूर : सहकारी शिक्षिकेचा विनयभंग करुन अश्लील कृत्य केल्याप्रकरणी एका वरिष्ठ माध्यमिक शाळेतील शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने 11 नोव्हेंबर रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिक्षण विभागानेही ही बाब गांभीर्याने घेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे पथक शाळेत पाठवले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात हा घृणास्पद प्रकार समोर आला आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी हा विज्ञानाचा शिक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे. अटकेनंतर शिक्षण विभागाकडून निलंबनाची कारवाई होऊ शकते. या घटनेनंतर शाळेमध्ये संतापाचे वातावरण आहे. अशा प्रकारची कृती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असे शाळेतील इतर शिक्षकांचे म्हणणे आहे. शिक्षक दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी इतर शिक्षकांनी उचलून धरली आहे. यामुळे शाळेचे नाव तर खराब झाले आहेच, पण मुलांच्या मनावरही वाईट परिणाम झाला आहे, अशी शिक्षकांची भावना आहे.

छेडछाड वाढल्याने शिक्षिकेची पोलिसात धाव

या घटनेनंतर शिक्षक शाळेत जायचा, मात्र हजेरी रजिस्टरवर सही करून शाळेतून गायब होत असे. आरोपीने यापूर्वीही असे प्रकार केले आहेत. या घटनेनंतर पीडित शिक्षिका चांगलीच घाबरली होती. त्यामुळे ती आपल्या आईसोबत शाळेत यायची. पीडितेने सांगितले की, तिने आरोपीला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकत नव्हता. वारंवार त्याने छेडछाड केल्यामुळे तिने पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

आरोपी शिक्षकाला अटक

या प्रकरणी कौलारी पोलिस स्टेशनचे एसएचओ नरेश पोशवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 नोव्हेंबर रोजी एका वरिष्ठ माध्यमिक शाळेतील शिक्षिकेसोबत विनयभंगाचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तिच्या सहकारी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

डॉक्टरची एक लाखाची ऑफर, डोंबिवलीत गणपती मंदिराजवळ आईने पोटचं बाळ सोपवलं, पण…

दहावीतील विद्यार्थिनीवर 25 वर्षीय तरुणाचे वार, डोकं धडावेगळं होऊन जागीच गतप्राण

चौघा भावांचे केस कापण्यास न्हाव्याचा नकार, घरात घुसून भावंडांकडून निर्घृण हत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI