AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोचा डावा हात निकामी, CISF जवान पतीने सुपारी देऊन जीवच घेतला

दीपिका शर्माची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तिचा भाऊ कुमार भानू याच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीपिकाला चार वर्षांपूर्वी दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यात एक गोळी तिच्या डाव्या हाताला लागली होती. यामुळे डाव्या हाताने काम करणे बंद झाले होते. या कारणावरून तिच्या सासरच्या मंडळींनी त्याला नापसंत करण्यास सुरुवात केली.

बायकोचा डावा हात निकामी, CISF जवान पतीने सुपारी देऊन जीवच घेतला
मयत दीपिका शर्मा
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 10:13 AM
Share

पाटणा : बिहारमधील मुंगेर येथील दीपिका शर्मा हत्या प्रकरणाचा पोलिसांनी 36 तासांत उलगडा केला आहे. खुनाचा कट रचणारा मुख्य आरोपी हा सीआयएसएफमध्ये कार्यरत असलेला दीपिकाचा पतीच असल्याचं उघडकीस आलं आहे. दीपिकाच्या पतीसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अपघातात हाताला गोळी लागल्याने तिच्या हाताला इजा झाली होती. पत्नी काम करु शकत नसल्यावरुन नाराज असलेल्या पतीने एक लाख वीस हजार रुपयांची सुपारी देऊन पत्नीची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

कासिम बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दीपिका शर्मा या विवाहित महिलेच्या हत्येप्रकरणी पोलीस अधीक्षक जगुनाथरेड्डी जलरेड्डी यांनी माहिती दिली. सोमवारी सकाळी दीपिका शर्माची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तिचा भाऊ कुमार भानू याच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी एसडीपीओच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली होती. जेव्हा टीमने तपास सुरु केला, तेव्हा तिच्या कुटुंबीयांचा हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा सुगावा लागला. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा दीर छोटू शर्मा, सासरा राजीव कुमार आणि आत्तेदीराचे कॉल डिटेल्स काढले. कारण खूनाच्या दिवशी छोटू आणि सुमित दोघेही घरात होते.

कॉल डिटेल्सने सुगावा लागला

कॉल डिटेल्सच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शामपूर येथील रहिवासी गौतम कुमार, संजीव कुमार आणि पतलू या शूटर्सचे फोनवरील संभाषण उघडकीस आले, त्यानंतर पोलिसांनी तिघांच्या घरांवर छापे टाकले आणि गौतम आणि संजीव यांना अटक करण्यात आली. तर पतलू पळून गेला.

1 लाख 20 हजार रुपयांना सौदा

अटक करण्यात आलेल्या शूटर गौतम कुमारची पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने हत्येमध्ये सहभाग असल्याचे कबूल केले. त्याने सांगितले की, सुमित कुमारने एक महिन्यापूर्वी फोन केला होता आणि सांगितले होते की माझा भाऊ रवी कुमार, जो सीआयएसएफ धनबादमध्ये कार्यरत आहे, त्याला त्याच्या पत्नीला ठार मारायचे आहे. 1 लाख 20 हजार रुपयांना सौदा ठरला. सुमितने गौतमला मोबाईलवरून रवीकुमारशी बोलायला लावले आणि गौतमला 20 हजार रुपये आगाऊ दिले.

माहेरी गोळीबारात महिला जखमी

मुंगेरचे एसपी जगुनाथरेड्डी जलरेड्डी यांनी सांगितले की, 2017 मध्ये मृत दीपिका शर्माच्या माहेरच्या घरात गोळीबाराची घटना घडली होती. त्यावेळी ती सात महिन्यांची गरोदर होती. त्या घटनेत गोळी लागल्याने दीपिकाच्या आईचा मृत्यू झाला होता, तर दीपिकाला दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यात एक गोळी तिच्या डाव्या हाताला लागली होती. यामुळे डाव्या हाताने काम करणे बंद झाले होते. या कारणावरून तिच्या सासरच्या मंडळींनी त्याला नापसंत करण्यास सुरुवात केली.

एसपी म्हणाले की, यामुळे संतापलेल्या पती आणि सासरच्या मंडळींनी दीपिकाच्या हत्येचा कट रचला. सोमवारी दीपिका स्वच्छतागृहात जात असताना शूटर्सनी भिंतीवरुन उडी मारून आत येत दीपिकावर गोळीबार केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेत सहभागी आरोपी पती, त्याचे दोन भाऊ आणि दोन शूटर्सना अटक करण्यात आली आहे तर एक फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिस छापे टाकत आहेत.

संबंधित बातम्या :

शेतात जाणाऱ्या महिलेची दोन्ही पाय कापून हत्या, जोडव्यांच्या चोरीसाठी सशस्त्र हल्ला

नंदनवनमध्ये दारुच्या वादातून मित्राची हत्या, आरोपीने गुन्ह्याची दिली कबुली

मशिनमध्ये स्कार्फ अडकला, पुण्यात 21 वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.