सुनीता मुकेशला प्रेमाने बोलली जीभ दाखवं, त्याने जीभ बाहेर काढताचं बायकोच भयानक कांड, अंगावर येईल काटा
पुरुष विकृतीच्या अनेक घटनांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. आता एका महिलेने टोकाची विकृती दाखवली. सुनीता मुकेशला खूप प्रेमाने जीभ दाखवण्यासाठी बोलली. मी सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवला. आधी मी थोडी जीभ बाहेर काढली.

काही व्यक्तींमध्ये विकृती असते. त्यात पुरुष किंवा महिला असा भेद करता येत नाही. पुरुष विकृतीच्या अनेक बातम्या आपल्या वाचनात येऊन गेल्या असतील. आता एका महिलेने असं विकृत वर्तन केलय की, तुमच्या अंगावर काटा येईल. या महिलेने पतीची जीभ कापून गिळून टाकली. पती रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असताना त्याचं सर्व रक्त प्याली. त्यानंतर ही आरोपी महिला तिथून पळून गेली. पतीला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पतीने पोलिसांना जे सांगितलं ते चक्रावून सोडणारं आहे. पतीच ऐकून पोलीस सुद्धा सून्न झाले. बिहारच्या गयाजीमध्ये ही भयानक घटना घडली आहे.
पीडित व्यक्तीच नाव मुकेश दास आहे. तो 36 वर्षांचा आहे. जीभ कापल्यामुळे त्याला काही बोलताही येत नाहीय. खिजरसराय भागातील हे प्रकरण आहे. मुकेशची पत्नी आशा वर्कर आहे. मुकेशच्या सांगण्यानुसार बायकोने त्याला गोड-गोड बोलण्यात फसवून हे कांड केलं. मुकेशने सांगितलं की, सोमवारी संध्याकाळी तो घरी आला. घरी येऊन तो जलजीरा प्याला. त्यावेळी पत्नी सुनीता त्याच्याजवळ आली. तू विष प्यालास असं तिने मला सांगितलं. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, असं नाहीय.
ते सर्व रक्त चाटलं
मुकेशच्या सांगण्यानुसार, सुनीताने त्याच्याजवळ जीभ दाखवण्याचा हट्ट धरला. आधी मी जीभ दाखवत नव्हतो. सुनीता मुकेशला खूप प्रेमाने जीभ दाखवण्यासाठी बोलली. मी सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवला. आधी मी थोडी जीभ बाहेर काढली. त्यावर सुनीता म्हणाली अजून थोडी बाहेर काढं. तिच्यावर विश्वास ठेऊन मी तिला जीभ दाखवत असताना तिने पटकन माझी जीभ कापली व गिळून टाकली. जीभेतून भरपूर रक्तस्त्राव सुरु होता. सुनीताने ते सर्व रक्त चाटलं.
खोदून खोदून विचारल्यावर सत्य सांगितलं
पीडित मुकेश आधी सत्य लपवत होता. आधी त्याने सांगितलं की, मी घरी पंखा दुरुस्त करत होतो. टेबलवर चढलेलो. टेबलावरुन मी तोंडावर पडलो. त्यामुळे माझी जीभ कट झाली. मुकेशला खोदून खोदून विचारलं, तेव्हा त्याने बऱ्याचवेळाने सत्य सांगितलं.
टाळं न उघडताच कशी घराबाहेर पडली?
मुकेशने सांगितलं की, पत्नी सुनीता विचित्र हरकती करायची. एकदा सुनीताने मुलीला सोबत घेऊन पहिल्या मजल्यावरुन उडी मारली होती. पण दोघींना काही झालं नाही, हे पाहून मी हैराण होते असं मुकेश म्हणाला. मला असं वाटत की तिच्याकडे काहीतरी शक्ती आहे. एकदा सुनीताने मुलीला उचलून घेतलेलं. दरवाजा बंद होता. टाळं होतं. सुनीता टाळं न उघडताच बाहेर निघून गेली. पत्नीच्या या वागण्याबद्दल मी कधीच कोणाजवळ काही बोललो नाही. कारण लोक मला मूर्ख बोलून माझी थट्टा करतील.
मुकेश-सुनीताला किती मुलं?
मुकेशला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. तिन्ही मुलं 12 वर्षाच्या आतल्या वयोगटातली आहेत. तिन्ही मुलं आता आजी-आजोबांकडे आहेत. पत्नी सुनीताबद्दल काही माहित नाहीय. घटनेनंतर ती फरार आहे. पोलीस आरोपी पत्नीचा शोध घेत आहेत.
