AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विचित्र माणूस! आधी खून केला, मग GFचे कपडे काढले… नेमकं काय घडलं?

एक अतिशय विचित्र घटना समोर आली आहे. एका खुन्याने खून केल्यानंतर जे काही केलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आता नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया..

विचित्र माणूस! आधी खून केला, मग GFचे कपडे काढले... नेमकं काय घडलं?
Crime_SceneImage Credit source: TV9 Network File Photo
| Updated on: Aug 28, 2025 | 4:33 PM
Share

खुनाच्या घटना तुम्ही खूप ऐकल्या असतील, पण तुम्ही कधी अशा खुन्याबद्दल ऐकलं आहे का, जो खून केल्यानंतर मुलींचे कपडे काढायचा. ते काढलेले कपडे स्वत: घालायचा आणि डोक्यावर विग घालायला भाग पाडायचा? होय, असेच एक प्रकरण समोर आला आहे, जिथे एका बिलावरून झालेला वाद इतका वाढला की, एका व्यक्तीने आपल्या मित्राची क्रूरपणे हत्या केली. चला, तुम्हाला संपूर्ण प्रकरण सांगतो.

तारीख होती 18 ऑगस्ट, ठिकाण – टँपा, फ्लोरिडा. 42 वर्षीय अर्नाल्डो सिन्ट्रॉन (Arnaldo Cintron) आपली गर्लफ्रेंड गिजेल बोनिला आणि तिची चुलत बहीण हियोजाइरा व्हेल्झ बोनिला यांच्यासोबत राहत होता. त्या दिवशी घरी पार्टी सुरू होती आणि हियोजाइराचा बॉयफ्रेंड एल्गा डेव्हिसही तिथे उपस्थित होता. त्याच रात्री घरात पैशांवरून वाद सुरू झाला. पाहता पाहता भांडण इतकं वाढलं की, अर्नाल्डोने अचानक चाकू उचलला आणि हियोजाइरावर हल्ला केला.

हियोजाइराचा बॉयफ्रेंड एल्गा डेव्हिस त्या क्षणी स्तब्ध झाला. त्याला काहीच कळलं नाही की नेमकं काय झालं. त्याने सांगितलं की, ‘मी फक्त घशावर वार केल्याचा आवाज ऐकला आणि अचानक पाहिलं की हियोजाइरा जमिनीवर पडली. अर्नाल्डो वारंवार हियोजाइरावर चाकूने वार करत होता. मी मदत करू इच्छित होतो, पण मला भीती वाटली.’

वाचा: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसला दिर, नको ते करू लागला… सासू-सासऱ्यांनी पाहूनही…

विग आणि कपडे घालण्यास भाग पाडलं

खून केल्यानंतर अर्नाल्डोने केवळ दहशत पसरवली नाही, तर विचित्र कृत्येही केली. अर्नाल्डो आणि गिजेलने स्वतः हियोजाइराची विग आणि कपडे घातले. त्यानंतर अर्नाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड गिजेलने एल्गा डेव्हिसला धमकावून कपडे आणि विग घालण्यास आणि रक्त साफ करण्यास भाग पाडलं. डेव्हिस घाबरला होता, त्यानंतर त्याने त्यांच्या सांगण्याप्रमाणे केलं, सर्वांनी मिळून मृतदेह किचनमधून गॅरेजपर्यंत नेला आणि नंतर मृतदेह कारमध्ये ठेवला. मृतदेह एका बॉक्समध्ये भरून कारच्या मागच्या सीटवर ठेवला गेला. त्यानंतर ते लोक मृतदेह टाकण्यासाठी निघाले. मृतदेह वीडन आयलंड प्रिझर्व्ह (Weedon Island Preserve) मध्ये पुरला गेला.

सत्य समोर कसं आलं?

मात्र, नंतर डेव्हिसने पोलिसांना संपूर्ण सत्य आणि ठिकाण सांगितलं, ज्यानंतर मृतदेह जप्त करण्यात आला. खून आणि संपूर्ण कट रचल्यानंतर पोलिसांनी 18 ऑगस्ट रोजी अर्नाल्डो सिन्ट्रॉन आणि गिजेल बोनिलाला अटक केली. अर्नाल्डो सिन्ट्रॉनवर दुसऱ्या श्रेणीचा खून, शस्त्राचा वापर, मृतदेह बेकायदेशीरपणे नेणे, पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदारावर प्रभाव टाकण्याचा आरोप आहे. त्याला जामीन न देता तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. गिजेल बोनिलावर 200,000 डॉलर (अंदाजे 1.5 कोटी रुपये) जामिनावर पुराव्यांशी छेडछाड, मृतदेह बेकायदेशीरपणे नेणे, साक्षीदारावर प्रभाव टाकणे आणि खुनानंतर मदत करण्याचे आरोप आहेत.

अटकेनंतर हिल्सबरो काउंटीचे शेरिफ चॅड क्रोनिस्टर म्हणाले, ‘हा खून अत्यंत क्रूर आणि भयानक होता. त्यानंतर त्यांनी पुरावे लपवण्याचा आणि मृतदेह पुरण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला तो आणखी क्रूर आहे.’ सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कैद्यांवरील खटला सुरू आहे.

Follow Us
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू