AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगड्या, वाहिलेलं कुंकू आणि… जालन्यातील शाळेतील कृत्य पाहून विद्यार्थ्यांमध्ये घबराट, एकच पळापळ

जालन्यातील गोंदी येथील शाळेत एक भयानक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जादूटोण्यासारखे कृत्य केल्याची घटना समोर आली असून प्रचंड खळबळ माजली आहे.

बांगड्या, वाहिलेलं कुंकू आणि... जालन्यातील शाळेतील कृत्य पाहून विद्यार्थ्यांमध्ये घबराट, एकच पळापळ
जालन्यातील शाळेत एक भयानक प्रकार घडला
| Updated on: Dec 16, 2024 | 3:27 PM
Share

जालन्यातील गोंदी येथील शाळेत एक भयानक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जादूटोण्यासारखे कृत्य केल्याची घटना समोर आली असून प्रचंड खळबळ माजली आहे. शाळेच्या एका वर्गामध्ये जादूटोण्याचं काही सामान ठेवल्याचं दिसल्याने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण होतं आणि ते पाहून अनके विद्यार्थ्यांनी जीवाच्या भीतीने पटापट वर्गाबाहेर पळ काढला. याप्रकरणी शालेय व्यवस्थापन समितीने पोलिसांना निवेदन दिलं आहे. मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल करून न घेतल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे आदेश दिले होते. मात्र जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचेही दिसत असून अनागोंदी कारभार उघड झालाय.

नेमकं घडलं तरी काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यामधील गोंदी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जादूटोण्यासारखं कृत्य केल्याचं समोर आलं आहे. तेथील नववीच्या वर्गात हा सगळा प्रकार घडल्याचं उघड झालं आहे. शाळेतील वर्गामध्ये बांगड्या ,वाहिलेलं हळद कुंकू आणि बाहुली आढळून आली. मात्र हा सगळा प्रकार पाहून नववीच्या वर्गातील विद्यार्थी अतिशय घाबरले.जादूटोण्याचं ते सामान पाहून संपूर्ण शाळेत भीतीचं वातावरण निर्माण झालं. धक्कादायक गोष्ट म्हणजे या शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे देखील काही दिवसापूर्वीच चोरी गेल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी जालन्यातील गोंदी पोलिसांना निवेदन दिलं. शाळेत घडलेला सर्व प्रकार सांगत जादूटोण्याचा संशय त्यांनी पोलिसांसमोर व्यक्त केला, मात्र पोलिसांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून इतक दिवस उलटूनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे आदेश दिले होते मात्र जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने हे प्रकार समोर येत आहे. यामुळे मोठी खळबळ माजली असून .यावर पोलीस कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...