AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लातूरमध्ये माणुसकीला काळिमा ! महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत शेजाऱ्यानेच केला अत्याचार

पीडिता ही अंध आणि कर्णबधिर असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने पिडीतेला घराजवळच्या शेतात ओढत नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले.

लातूरमध्ये माणुसकीला काळिमा ! महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत शेजाऱ्यानेच केला अत्याचार
रिकव्हरी एजंटने गर्भवतीला ट्रॅक्टरखाली चिरडले !Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Sep 03, 2022 | 9:51 PM
Share

लातूर : अंध आणि मूकबधिर असलेल्या एका महिलेला ऊसाच्या फडात ओढत नेत तिच्यावर अत्याचार (Assault) केल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या गातेगावमध्ये घडली आहे. पिडीत महिलेच्या शेजारी (Neighbour)च राहणाऱ्या आरोपीने हे कृत्य केले आहे. घराजवळ असलेल्या ऊसा (Sugarcane)त ओढत नेऊन अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी गातेगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. सुरुवातीला तक्रार नोंदवायला टाळाटाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.

आरोपी नेहमी पीडितेची छेडछाड काढायचा

गातेगाव पोलिसांच्या हद्दीत असलेल्या गातेगाव या गावात दोन अंध-मूकबधिर महिला आपल्या भावाच्या कुटुंबासोबत राहतात. पीडिता आणि आरोपी हे शेजारी शेजारी आहेत. पीडितेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत आरोपी बाळासाहेब साबळे हा गेल्या काही दिवसांपासून पीडिता आणि तिच्या बहिणीसोबत घरी येऊन छेडछाड करायचा.

लोकांना येताना पाहताच आरोपीने पळ काढला

पीडिता ही अंध आणि कर्णबधिर असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने पिडीतेला घराजवळच्या शेतात ओढत नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले. पिडीतेचा आरडा-ओरडा ऐकून काहींनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता आरोपीने पळ काढला.

पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा नातेवाईकांचा आरोप

पिडीता आणि तिचे नातेवाईक पोलीस ठाण्यात गेल्यानंतर गुन्हा दाखल करायला कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे गुन्हा दाखल करायला वेळ लागला असा नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. (Blind and mute deaf woman molested by accused neighbour in Latur)

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!