AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवासी ओरडले,वाचवत राहिले, पण त्याचं मारणं थांबलं नाही.. लोकलमध्ये सीटच्या वादावरून नेत्रहीन महिलेला मारहाण

मुंबईतील लोकलमध्ये एका अंध महिलेवर झालेल्या बेरहमीच्या हल्ल्याने सर्वत्र धक्का बसला आहे. कांजुरमार्ग ते टिटवाळाच्या लोकलमध्ये एका इसमाने या महिलेला सीटसाठी वादानंतर मारहाण केली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आरोपीला जीआरपीने अटक केली आहे. या घटनेने मुंबईच्या लोकल प्रवासातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

प्रवासी ओरडले,वाचवत राहिले, पण त्याचं मारणं थांबलं नाही.. लोकलमध्ये सीटच्या वादावरून नेत्रहीन महिलेला मारहाण
mumbai local
Follow us
| Updated on: May 21, 2025 | 10:30 AM

मुंबईतील लाईफलाइन लोकलमध्ये भांडणं होणं काही नवीन नाही. प्रत्येक प्रवाशाला त्याचा कधी ना कधी अनुभव येतच असतो. पण नुकतंच मुंबईत जे घडलं ते पाहून नेहमीचे प्रवासीदेखील हादरलेत. कांजुरमार्गहून टिटवाळ्यादरम्यान एका नेत्रहीन महिलेशी सीटवरून झालेल्या वादनंतर एका इसमाने तिला बेदम मारहाण केली. गाडीतील इतर प्रवासी त्याला रोखण्याचा, वाद थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण रागाचं भूत डोक्यावर स्वार झालेल्या त्या इसमाला काहीच समजत नव्हतं. अंध महिलेवर हल्ला करणाऱ्या त्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं घडलं तरी काय ?

कांजूरमार्गहून टिटवाळा येथे प्रवास करणाऱ्या एका अंध महिलेवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली जीआरपीने 40 वर्षीय पुरूषाला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. ही महिला दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या कोचमधून प्रवास करत होती. या हल्ल्याचा एक व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. त्या व्यक्तीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे कल्याण पोलिस ठाण्यात विनयभंग, मारहाण आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. नंतर हा खटला ‘झिरो एफआयआर’ म्हणून कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. टिटावळ्याच्य़ा दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास कांजुरमार्ग ते कळवा दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका 33 वर्षीय अंध महिलेने अपंग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यात प्रवेश केला, मात्र तेव्हा डब्यातील सर्व जागा भरल्याचे तिला आढळलं. तेथील राखीव जागेवर मुंब्रा येथील रहिवासी असलेले मोहम्मद इस्माईल (वय 40) बसले होते. ते त्यांच्या गर्भवती पत्नीसह आणि १० वर्षांच्या मुलीसोबत प्रवास करत होते. मात्र त्या अंध महिलेला बसायला जागा द्या, अशी विनंती त्याच कोचमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी इस्माईल यांना केली, कारण ती महिला सीटसाठी पात्र होती.

मात्र, यादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. वादादरम्यान महिलेने इस्माइलला शिवीगाळ केली, संतपालेल्या त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण तो तिला मारहाण करतच राहिला. महिलेवर हल्ला केल्यानंतर, इस्माईल मुंब्रा रेल्वे स्थानकावर उतरला. त्यानंतर, महिलेने कल्याण रेल्वे स्थानकावर उतरून त्याच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली.

त्या महिलेच्या तक्रारीवरून, मोहम्मद इस्माईलविरुद्ध बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार आणि अपंग व्यक्तींच्या हक्क कायद्याच्या कलम 92(अ)(ब) अंतर्गत विनयभंग, हल्ला आणि धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण जीआरपीने मंगळवारी आरोपीला अटक केली. पुढील तपास सुरू असून अशा घृणास्पद कृत्याला बळी पडलेल्या पीडितेला न्याय मिळवून देऊ असं जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.