Buldhana Scam : बुलढाण्यातील पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा प्रकरण, सीआयडीकडून संचालक मंडळाला अटक

| Updated on: Jun 17, 2022 | 11:51 PM

विशेष लेखा परीक्षण विभागाने पतसंस्थेचे ऑडिट करून संस्थापक अध्यक्षांसह तत्कालीन संचालक तसेच कार्यकारी अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवला होता. पतसंस्थेच्या पालघर, पुणे, सांगवी, सांगली यासह बुलडाणा जिल्ह्यतील असलेल्या शाखेत अपहार झाल्याची नोंद आहे. तसेच इतर शाखेतसुद्धा अपहार झालेला आहे.

Buldhana Scam : बुलढाण्यातील पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा प्रकरण, सीआयडीकडून संचालक मंडळाला अटक
सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या संचालक मंडळाला अटक
Image Credit source: Tv9
Follow us on

बुलढाणा : सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेचे संस्थापक चंद्रकांत बढे यांच्यासह संचालक मंडळा (Board of Director)ला बुलढाणा सीआयडीच्या पथकाने वरणगाव येथून अटक (Arrest) केली आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. चंद्रकांत हरी बढे, राजेंद्र विश्वनाथ चौधरी, भागवत मुरलीधर पाटील, बळिराम केशव माळी, गोविंद ज्ञानेश्वर मांडवगणे, भिकू शंकर वंजारी, विजय गणपत वाघ सर्व अटक संचालकांची नावे आहेत. राज्यभर कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेतील घोटाळ्यांबाबत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याने संचालक मंडळाविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. या पतसंस्थेत कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल लेखापरिक्षकांनी दिला होता.

गेल्या 7 ते 8 वर्षापासून ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत मिळणे बंद झाले

विशेष लेखा परीक्षण विभागाने पतसंस्थेचे ऑडिट करून संस्थापक अध्यक्षांसह तत्कालीन संचालक तसेच कार्यकारी अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवला होता. पतसंस्थेच्या पालघर, पुणे, सांगवी, सांगली यासह बुलडाणा जिल्ह्यतील असलेल्या शाखेत अपहार झाल्याची नोंद आहे. तसेच इतर शाखेतसुद्धा अपहार झालेला आहे. याप्रकरणी बढेंसह तत्कालीन संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याचप्रमाणे याप्रकरणाची सीआयडी चौकशी देखील सुरू होती. गेल्या 7 ते 8 वर्षापासून बढे पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे पतसंस्थेवर अवसाहय्यक नियुक्त करण्यात आले होते. पतसंस्थेतील कार्यकारी अधिकारी मधुसूदन पाटील यांनी देखील अपहाराबाबत तक्रार केलेली आहे. बुलढाणा सीआयडीच्या एका पथकाने काल या पतसंस्थेच्या संचालक मंडळातील आरोपी चंद्रकांत हरी बढे, राजेंद्र विश्वनाथ चौधरी, भागवत मुरलीधर पाटील, बळिराम केशव माळी, गोविंद ज्ञानेश्वर मांडवगणे, भिकू शंकर वंजारी, विजय गणपत वाघ या सात संचालकांना वरणगाव येथून अटक करून बुलढाण्यात आणले. तर आरोपींना बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा