Sangli Bogus Fertilizer : सांगलीत 7 लाख 78 हजाराचा बोगस रासायनिक खताचा साठा जप्त

गुण नियंत्रक पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथक यांनी मणेराजुरी येथील एका पोल्ट्री शेडवर छापा टाकला. यावेळी ट्रकमधून खताची पोती उतरविण्यात येत होती. शेडमध्ये विना लेबल रासायनिक मिश्र खत, गोळी व दाणेदार खत यांची 50 किलो वजनाची पोती आढळली.

Sangli Bogus Fertilizer : सांगलीत 7 लाख 78 हजाराचा बोगस रासायनिक खताचा साठा जप्त
सांगलीत 7 लाख 78 हजाराचा बोगस रासायनिक खताचा साठा जप्तImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 11:08 PM

सांगली : कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाने पोलासांसमवेत सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील मळ्यात छापा (Raid) टाकून तब्बल 7 लाख 78 हजाराचा बोगस रासायनिक खता (Bogus Chemical Fertilizer)चा साठा जप्त (Seized) केला आहे. गुजरातमधील नॅशनल फर्टिलायझरच्या नावाने या खताचे पँकिंग करण्यात येत होते. खत निर्मिती, विक्री याचा परवाना नसताना साठा आणि पॅकिंग करण्यात येत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी 36.90 टन खत बनावट असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आले. याची बाजारातील किंमत 7 लाख 38 हजार रुपये आहे. याप्रकरणी दोघांविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

दोघांविरोधात फिर्याद दाखल

गुण नियंत्रक पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथक यांनी मणेराजुरी येथील एका पोल्ट्री शेडवर छापा टाकला. यावेळी ट्रकमधून खताची पोती उतरविण्यात येत होती. शेडमध्ये विना लेबल रासायनिक मिश्र खत, गोळी व दाणेदार खत यांची 50 किलो वजनाची पोती आढळली. खत निर्मिती, विक्री याचा परवाना नसतानाही खताचा साठा आणि पॅकिंग करण्यात येत होते. या प्रकरणी खताचा व्यवसाय करणारे मुजाहिद मुजावर (25) आणि रमजान मन्सूर मुजावर (27) दोघे रा. मणेराजुरी या दोघांविरुध्द तासगाव पोलीस ठाण्यात गुण नियंत्रक सुरेंद्र पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

अमरावतीतही खरिपाच्या तोंडावर युरियाची तस्करी

मान्सूनचे आगमन झाले असून खरीप तोंडावर असल्याने शेतकरी आता शेतीकामाला लागला आहे. खरिपाच्या तोंडावर युरिया खतांची तस्करी होत असल्याचं उघडकीस आलं आहे. अमरावतीतून मध्य प्रदेशात युरियाची तस्करी होत आहे. कृषी विभाग आणि पोलिसांच्या मदतीने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. अमरावतीच्या पांढरघाटी येथून मध्य प्रदेशात युरियाची तस्करी होत असल्याची माहिती प्रशासनाला होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. यात ट्रकसह 240 युरियाच्या बॅग जप्त करण्यात आल्यात. या प्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई पोलीस आणि कृषी विभागाकडून केली जात आहे. (7 lakh 78 thousand bogus chemical fertilizer stocks seized in Sangli)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.