CCTV Video : अंबरनाथच्या वुलन चाळीत गावगुंडांचा धिंगाणा, दुकानदारांकडून पैसे मागत गाड्यांची तोडफोड, गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद

अंबरनाथ पश्चिमेच्या वुलन चाळ परिसरात हैद्राबाद एग सेंटर नावाचं दुकान आहे. सोमवारी 13 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास याच भागातील शिवनगर परिसरातले काही गावगुंड तिथे आले आणि त्यांनी दुकानदारांकडे पैसे मागायला सुरुवात केली. मात्र दुकानदारांनी पैसे द्यायला नकार दिला.

CCTV Video : अंबरनाथच्या वुलन चाळीत गावगुंडांचा धिंगाणा, दुकानदारांकडून पैसे मागत गाड्यांची तोडफोड, गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद
अंबरनाथच्या वुलन चाळीत गावगुंडांचा धिंगाणाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 10:39 PM

अंबरनाथ : अंबरनाथच्या वुलन चाळ परिसरात गावगुंडां (Goons)नी दुकानदारांकडे हफ्ते मागत धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यानं या गावगुंडांनी काही गाड्यांची तोडफोड (Vandalism) केली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र याबाबत पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. वुलन चाळ परिसरातील अंबिका मंदिर भागात काही दुकानं रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. या दुकानांमध्ये नशेच्या साहित्याची विक्री होत असल्यानं शहराबाहेरूनही अनेक नशेडी आणि टपोरी तरुण रात्री उशिरापर्यंत इथं येत असतात. त्यामुळं या सगळ्यावर पोलिसांनी वचक ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

दुकानदारांनी पैसे देण्यास नकार दिल्याने तोडफोड

अंबरनाथ पश्चिमेच्या वुलन चाळ परिसरात हैद्राबाद एग सेंटर नावाचं दुकान आहे. सोमवारी 13 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास याच भागातील शिवनगर परिसरातले काही गावगुंड तिथे आले आणि त्यांनी दुकानदारांकडे पैसे मागायला सुरुवात केली. मात्र दुकानदारांनी पैसे द्यायला नकार दिला. याचा राग आल्याने या गावगुंडांनी तिथे उभ्या असलेल्या काही गाड्यांची तोडफोड केली आणि निघून गेले. हा सगळं प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. (Vandalism by goons in Woolen Chawl of Ambernath demanding money from shopkeepers)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.